• Download App
    शहीद कॅप्टन विक्रम बत्राच्या शेरशहातून प्रसिध्दी मिळविण्याचा बरखा दत्तचा प्रयत्न, नेटकऱ्यांनी सुनावल्यावर बोलती झाली बंद|Barkha Dutt's attempt to gain fame from Sher Shah of martyred Captain Vikra, netizen trolledm Batra,

    शहीद कॅप्टन विक्रम बत्राच्या शेरशहातून प्रसिध्दी मिळविण्याचा बरखा दत्तचा प्रयत्न, नेटकऱ्यांनी सुनावल्यावर बोलती झाली बंद

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कारगिल युध्दातील हिरो शेरशहा म्हणविले जाणारे शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आलेल्या शेरशहा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न प्रसिध्द पत्रकार बरखा दत्त यांनी केला. मात्र, नेटकºयांनी यावरून चांगलेच सुनावले. तुमच्यामुळेच पाकिस्तान्यांना आपल्या सैन्याच्या ठिकाणांचा पत्ता लागला असे म्हटल्यावर बरखा दत्त यांची बोलतीच बंद झाली.Barkha Dutt’s attempt to gain fame from Sher Shah of martyred Captain Vikra, netizen trolledm Batra,

    विक्रम बत्रा यांच्या जीवनावरील चित्रपट शेरशहा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पत्रकार बरखा दत्त यांची वादग्रस्त भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. बरखा दत्त यांनी केलेल्या संशयास्पद कव्हरेजमुळे शत्रू सैन्याला भारतीय सैन्याचा ठिकाणा समजला अशी टीका सोशल मीडियातून होत आहे.



    एका ट्विटर यूजरने म्हटले की, शेरशाह चित्रपटात बरखा दत्तचा भाग समाविष्ट करायला हवा होता. काल शेरशाह चित्रपट पाहिला. कारगिल युद्धात बरखा दत्तने काय केले याची आठवण झाली. चित्रपट निर्मात्यांनीही तिचा भाग दाखवायला हवा होता.

    हे ट्विट पाहिल्यावर बरखा दत्त यांना वाटले की त्यांचे कौतुकच करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी ट्विटला उत्तर देत कृतज्ञता व्यक्त केली. ये दिल मांगे मोरे ही त्यांची मुलाखत असल्याचे सांगितले. ही मुलाखत आपल्या मनात कायम कोरली गेल्याचेही त्या म्हणाल्या.मात्र, या ट्विटर यूजरने बरखा यांचा निषेध करत म्हटले की तुमचे स्वागत आहे पण माझा अर्थ होता की तुम्ही पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याची माहिती मिळण्याचा मार्ग दाखविला.

    Barkha Dutt’s attempt to gain fame from Sher Shah of martyred Captain Vikra, netizen trolledm Batra,

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!