विशेष प्रतिनिधी
दिल्ली : बेबी राणी मौर्य यांनी उत्तराखंडच्या राज्यपालापदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले आहेत. उत्तराखंड राज्याच्या राज्यपालपदी सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल गुरमित सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांच्याकडे पंजाबचा कार्यभार देण्यात आला आहे.Banwarilal Purohit holds the post of Punjab Governor, transfer of Governor from the President
आर. एन रवी यांच्याकडे नागालँडचे राज्यपालपद होते. मात्र, आता त्यांना तामिळनाडू राज्यपालपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर आसामचे विद्यमान राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे नागालँडच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभर देण्यात आला आहे.
बेबी राणी मौर्य यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या उत्तराखंडच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. यामध्ये उत्तराखंड, पंजाबसह इतर राज्यांचा समावेश आहे.
बेबी राणी मौर्य यांनी आपल्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजप मौर्य यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याचा विचार करत असल्याचेही राजकीय जाणकार सांगत आहेत.
Banwarilal Purohit holds the post of Punjab Governor, transfer of Governor from the President
महत्त्वाच्या बातम्या
- तेजस्वी यादव – चिराग पासवान यांच्या भेटीची पाटण्यापासून दिल्लीपर्यंत चर्चा
- फ्रॉन्समध्ये महिलांना गर्भनिरोधक साधने मोफत मिळणार
- जम्मू आणि काश्मिरच्या विशेष दर्जासाठी संघर्ष सुरूच ठेवणार – फारुक अब्दुल्ला
- मेघालयचे शिट्टी वाजणारे गाव भारतातील ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव’ म्हणून नामांकित
- लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने दिली राष्ट्रीय आणि सामाजिक जीवनाला सांस्कृतिक श्रीमंती…!!