• Download App
    देशात १३ एप्रिलपासून चार दिवस बँका राहणार बंद ; १२ एप्रिलला कामे पूर्ण करा ; अन्यथा वाट पाहावी लागणार ।Banks will remain closed for 4 consecutive days from April 13

    देशात १३ एप्रिलपासून चार दिवस बँका राहणार बंद ; १२ एप्रिलला कामे पूर्ण करा ; अन्यथा वाट पाहावी लागणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात १३ एप्रिलपासून सलग ४ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेची महत्त्वाची कामे असतील, तर उद्या म्हणजेच सोमवारी (१२ एप्रिल) पूर्ण करून घ्या. कारण उद्या कामं पूर्ण नाही केली तर तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागेल. Banks will remain closed for 4 consecutive days from April 13

    खरंतर एप्रिलमध्ये एकूण 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. या आठवड्यात बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत बँकाच्या सुट्या लक्षात घेऊन बँकेतील सर्व काम करणे आवश्यक आहे.



    सर्व राज्यांत एकसमान नियम नाहीत

    सर्व राज्यात बँकाना एकसमान सुट्या नाहीत. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरा होत नाही. आरबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, एप्रिलमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये ९ दिवस बँका बंद राहणार आहेत.

    बँकेच्या सुट्याची यादी

    • 13 एप्रिल – मंगळवार – उगाडी, तेलगू नवीन वर्ष, बोहाग बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव
    • 14 एप्रिल – बुधवार – डॉ. आंबेडकर जयंती, सम्राट अशोका जन्मदिन, तमिळ नवीन वर्ष, महा विशुबा संक्रांती, बोहाग बिहू
    • 15 एप्रिल – गुरुवार – हिमाचल दिन, विशु, बंगाली नवीन वर्ष, सरहुल
    • 16 एप्रिल – शुक्रवार – बोहाग बिहू
    • 18 एप्रिल – रविवार
    • 21 एप्रिल – बुधवार – राम नवमी, गारिया पूजा
    • 24 एप्रिल – चौथा शनिवार
    • 25 एप्रिल – रविवार – महावीर जयंती

    सणांमुळे बँका राहणार बंद

    तेलुगू नववर्ष, बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव आणि उगाडी या सणानिमित्त 13 एप्रिल रोजी बँकेला सुटी असेल. तर दुसर्‍या दिवशी 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बँका बंद राहणार आहेत. 15 एप्रिल रोजी हिमाचल दिन, विशु, बंगाली नववर्ष, सरहुल निमित्त काही राज्यांमध्ये सुटी असणार आहे. 21 एप्रिलला रामनवमी आणि 25 एप्रिलला महावीर जयंतीची सुटी असेल. तसेच 24 एप्रिल रोजी चौथा शनिवार असल्यानं त्या दिवशीही सुटी असणार आहे.

    Banks will remain closed for 4 consecutive days from April 13

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही