विशेष प्रतिनिधी
बंगळूर : वाढत्या कोरोनामुळे कर्नाटकची राजधानी बंगळुरात आरोग्य आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. कोविडबाधितांवर उपचार करण्यासाठी सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये, तसेच इतर खासगी रुग्णालयांत बेड आरक्षित करण्याची सक्ती करण्यात आली आहे.banglore declares helath emergancy
कोविड नसलेल्या प्रकरणात आई आणि बाळ यांच्यावरील उपचाराचे बेड, डायलिसिस बेड वगळून बाकीच्या सर्व बेड कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बाजूला ठेवण्याचा सरकार आज आदेश जारी करणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी स्पष्ट केले आहे.
शुद्ध वाऱ्यात ऑक्सिजन शुद्ध करून कोविड रुग्णांना देण्याचे उपकरण आणण्यात येणार आहे. या उपकरणातून वाऱ्यातील ऑक्सिजन कॉन्संट्रेट करून रुग्णांना ऑक्सिजन पुरविणे शक्य आहे, या गोष्टीत सरकारने लक्ष घातल्याचे ते म्हणाले.
संसर्गजन्य रोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार बंगळूरसह राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये तसेच बंगळूरमधील १३ खासगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सर्व आपत्कालीन बेड वगळता पूर्णपणे सज्ज आहेत.
banglore declares helath emergancy
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी रद्द केल्या उद्या होणाऱ्या बंगालमधील सर्व सभा, कोरोना परिस्थितीवर घेणार उच्चस्तरीय बैठक
- अनास्थेचा परिणाम : जानेवारीतच केंद्राने कोरोना लाटेचा राज्यांना दिला होता इशारा, दुर्लक्षामुळे महामारीचा झाला उद्रेक
- ‘जिथे कमी तिथे आम्ही’ : ऑक्सिजनसाठी कॉर्पोरेट- सरकारी कंपन्यांचा पुढाकार, टाटा-रिलायन्ससह अनेक कंपन्या मैदानात
- ‘या पापी समाजाचा भाग असल्याची लाज वाटते’ म्हणत न्यायालयानेदेखील महाराष्ट्र सरकारपुढे टेकले हात
- पाकिस्तानात चिनी राजदूत थांबलेल्या हॉटेलमध्ये तेहरिक ए तालिबानकडून बॉम्बस्फोट, ४ जण ठार, १२ जखमी