विशेष प्रतिनिधी
जामनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वामुळेच भारत कोविडच्या संकटावर मात करू शकला, अशा शब्दांत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी कौतुक केले. पारंपरिक औषधांच्या ज्ञानाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.Bangladesh’s Prime Minister Sheikh Hasina lauds Prime Minister Modi
गुजरातमधील जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना हसीना यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले की, “कोविड-19 साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात साध्य करण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत.
लसीकरणातही भारताने खूप चांगले काम केले आहे. कोविड-19 साथीने दाखवून दिले आहे की चांगल्या आरोग्यासाठी लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. जर पारंपारिक औषधांचा आधुनिक औषधांच्या बरोबरीने वापर केला गेला, तर जगाला शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार सर्वांसाठी मूलभूत आरोग्य सेवा देणे शक्य होईल.
भारत सरकारचे आभार मानताना शेख हसीना म्हणाल्या, कोविडच्या काळात भारताने संपूर्ण जगाला औषधे पुरविली. चांगल्या शेजाऱ्याचा धर्म निभावला.