• Download App
    बंगळूरु शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरण , निपाणी शहरात कडकडीत बंद|Bangalore Shivaraya statue desecration case, strictly closed in Nipani city

    बंगळूरु शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरण , निपाणी शहरात कडकडीत बंद

    निवारी सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.सकाळी साडे नऊ वाजल्यापासूनच मध्यवर्ती शिवाजी चौक येथे शिवप्रेमींनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.Bangalore Shivaraya statue desecration case, strictly closed in Nipani city


    विशेष प्रतिनिधी

    निपाणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार सदाशिवनगर बंगळूर इथे घडला आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली.

    आणि बेळगाव येथे क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आज निपाणी शहरात सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला.शनिवारी सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.



    सकाळी साडे नऊ वाजल्यापासूनच मध्यवर्ती शिवाजी चौक येथे शिवप्रेमींनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यानंतर विधिवत पूजा झाल्यानंतर शिवपुतळ्या दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर मध्यवर्ती शिवाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.

    मोर्चाच्या अग्रभागी बाल शिवाजीच्या रूपातील विराज पाटील हा चिमुकला होता. व अन्य पाच मुली भगवा ध्वज घेऊन मोर्चाच्या अग्रभागी होत्या. शहरातील व्यापाऱ्यांनी या मोर्चात आपले सर्व व्यवहार बंद ठेवून सहभाग नोंदवला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित झाले होते.

    या मोर्चाला माजी मंत्री विरकुमार पाटील, माजी मंत्री काकासाहेब पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, मान्यवर हजारो शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Bangalore Shivaraya statue desecration case, strictly closed in Nipani city

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली