वृत्तसंस्था
दिल्ली : केंद्र सरकारने सिंगल युज प्लास्टिक बंदी धोरण राबविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे देशातील वाढत्या प्लास्टिक वापराला आळा घालता येणार आहे. येत्या १ जुलै पासून कप, प्लेट्स आणि स्ट्रॉजसारख्या सर्व वापरात असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर देशात बंदी घालण्यात आली आहे. Ban on single use plastics; Will be implemented across the country from July 1; Strict action will be taken against those who break the rules
या बंदीमुळे पॉलिथीन पिशव्यांची जाडी ५० मायक्रॉनवरून १२० मायक्रॉनपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ऑगस्ट २०२१ मध्ये याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली होती. आता १ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
‘या’ वस्तूंचा समावेश
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाठवलेल्या नोटिशीनुसार, १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेले पीव्हीसी बॅनर, सजावटीसाठीचे थर्माकॉल, फुग्यासाठी वापरण्यात येणारी प्लास्टिकची स्टिक, आदीसह इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्याशिवाय प्लास्टिकचे चमचे, प्लेट, ग्लास स्ट्रॉ, ट्रेसह मिठाईच्या बॉक्सवर वापरण्यात येणारे पास्टिकवर बंदी घातली जाणार आहे.
सीपीसीबीने जारी केलेल्या या नोटिशीत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यात उत्पादन जप्त करणे, पर्यावरणाची हानी केल्याबद्दल दंड आकारणे, तसेच, त्यांच्या उत्पादनाशी संबंधित उद्योग बंद करण्यासारख्या कारवाईचा समावेश आहे.
Ban on single use plastics; Will be implemented across the country from July 1; Strict action will be taken against those who break the rules
महत्त्वाच्या बातम्या
- मैत्रीत हिजाब आला अडवा, उडुपीत एकत्र जेवण करणाऱ्या मुली आता हिंदू-मुस्लिममध्ये विभागल्या
- पूर्वोत्तर राज्ये भारताचा भाग नाही, भारताचे वर्णन केवळ ‘गुजरात ते बंगाल’; राहुल गांधीविरोधात तक्रार
- सरकारी नोकऱ्यांमध्ये 21,255 पदे रिक्त दोन वर्षांत 2,65,468 पदे भरली
- रशिया या आठवड्यात युक्रेनवर हल्ला करणार 16 फेब्रुवारी हा हल्ल्याचा दिवस : व्लादिमीर झेलेन्स्की
- गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक : कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण