वृत्तसंस्था
नवी दिल्ली : २७ किटकनाशकांवर बंदी घालण्याच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीवर केंद्रीय कृषी मंत्रालय या आठवड्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे यावर तातडीने निर्णय होईल की नाही, याबाबत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ शंका व्यक्त करत आहे. Ban on 27 pesticides? A decision from the Center is expected this week
बिझनेस लाईनने ही बातमी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किटकनाशकांच्या प्रस्तावित बंदीवरील राजेंद्रन समितीच्या अहवालाबाबत कृषी मंत्रालय मंत्रिस्तरीय चर्चा करू शकते.
केंद्र सरकारने मे २०२० मध्ये एक अधिसुचनेचा मसुदा प्रकाशित केला होता. ज्यामध्ये २७ किटकनाशकांवर बंदी घालण्याबाबत संबंधितांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. दरम्यान, भागधारकांनी केलेल्या विनंतीवरून आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्तक्षेपामुळे हरकती आणि सूचना मागविण्याची मुदत ४५ दिवसांवरून ९० दिवसांपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी सहाय्यक महासंचालक टी. पी. राजेंद्रन यांच्या नेतृत्त्वात कृषी मंत्रालयाने एका समितीची स्थापना करण्यात आली.
या समितीला तीन महिन्यात आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समितीचा अहवाल मंत्रालयाकडे नोव्हेंबर २०२१ मध्ये प्राप्त झाल्याची माहिती आहे. ६६ विवादित किटकनाशकांचा वापर त्यांच्या विषारीपणामुळे टप्प्याटप्प्याने थांबवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. प्रस्तावित २७ किटकनाशकांवरील बंदी हा याचाच एक भाग आहे.
उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या २७ कीटकनाशकांचे सध्याचे उत्पादन मूल्य सुमारे दहा हजार ३०० कोटी रुपये असून यापैकी ५८ टक्के किटकनाशकांची निर्यात होते. जर या किटकनाशकांच्या देशांतर्गत विक्रीवर बंदी घातल्यास आयात केलेल्या पर्यायी किटकनाशकांसाठी दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागतील, ज्याचा बोजा थेट शेतकऱ्यांवर पडणार आहे. केंद्रीय कृषी सचिवांनी गेल्याच आठवड्यात पदभार स्विकारला आहे. त्यामुळे त्यांना या विषयाचा नव्याने अभ्यास करण्यासाठी वेळ लागू शकतो.
दरम्यान, कृषी मंत्रालयाने आतापर्यंत देशात आयात, उत्पादन किंवा विक्रीसाठी ४६ कीटकनाशके आणि चार कीटकनाशकांच्या फॉर्म्युलेशनवर बंदी घातली आहे. तसेच पाच कीटकनाशकांच्या घरगुती वापरावर बंदी आहे, मात्र त्यांची निर्यात करण्याची परवानगी आहे आणि नऊ कीटकनाशके प्रतिबंधित वापराखाली आहेत.
बंदी घालण्यात येणारी किटकनाशके अशी :
अॅसिफेट, अॅट्राझीन, बेनफ्युरोकार्ब, ब्यूटाक्लोर, कॅप्टान, कार्बेन्डाझीम, कार्बोफ्युरॉन, क्लोरपायरीफॉस, डेल्टामेथ्रीन, डायकोफॉल, डायमिथोएट, डायनोकॅप, डायुरॉन, मॅलाथिऑन, मॅन्कोझेब, मेथिमील, मोनोक्रोटोफॉस, ऑक्सिफ्लुओरोफेन, पेंडिमेथालिन, क्विनॉलफॉस, सल्फोफ्युरॉन, थायोडीओकार्ब, थायोफॅन्टेमिथाइल, थायरम, झिनेब आणि झायरम
Ban on 27 pesticides? A decision from the Center is expected this week
महत्त्वाच्या बातम्या
- भारतालाही चांगले संबंध हवेत, पण आधी पाकिस्तानने २६/११ आणि पठाणकोट हल्ल्याच्या दोषींचा न्याय करावा, पंतप्रधान शरीफ यांना राजनाथ सिंह यांनी सुनावले
- समाजवादी पक्षाचा सपाटून पराभव, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
- Raj Thackeray : ‘देशात समान नागरी कायदा तातडीने लागू करा,’ विराट उत्तरसभेत राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
- Raj Thackeray : महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर ईडीचे छापे; राज ठाकरेंनी उलगडले पवार – मोदींचे “रहस्य”!!