• Download App
    दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली |Ban extended on Zakir Nikes Islamic Foundation

    दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – मुस्लिम युवकांना दहशतवादी कृत्यांसाठी चिथावणी दिल्याप्रकरणी झाकिर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) या संस्थेवर घातलेली बंदी पाच वर्षांनी वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.Ban extended on Zakir Nikes Islamic Foundation

    ढाकामध्ये २०१६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर नाईकने परदेशात पलायन केले. सध्या तो मलेशियात आहे. ब्रिटन व कॅनडाने व्हिसा नाकारल्यानंतर झाकिर नाईकला मलेशियाने आश्रय दिला आहे. तो आता मलेशियाचा कायमस्वरूपी रहिवासी असून त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती भारताने मलेशियाला केली आहे.



    आपल्या ‘पीस टीव्ही’ या वाहिनीमार्फत व सोशल मीडियावरून विविध समुदायांत तेढ निर्माण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये २०१६ मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात २० जण ठार झाले होते. नाईकच्या भाषणामुळे प्रभावित होऊन हा बॉम्बस्फोट घडविल्याची कबुली हल्लेखोराने दिली होती.

    त्यानंतर, केंद्र सरकारने १७ नोव्हेंबर २०१६ मध्ये बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार नाईकच्या आयआरएफ या संस्थेवर बंदी घातली होती. ही बंदी आणखी पाच वर्षांनी वाढविण्याची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी रात्री जारी केली.

    Ban extended on Zakir Nikes Islamic Foundation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!