• Download App
    बजरंग दलाने सांता क्लॉजचा पुतळा जाळला ; मुर्दाबादच्या दिल्या घोषणा|Bajrang Dal burns statue of Santa Claus; Murdabad's announcement

    बजरंग दलाने सांता क्लॉजचा पुतळा जाळला ; मुर्दाबादच्या दिल्या घोषणा

    बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांता क्लॉजच्या पुतळ्यावर पेट्रोल टाकून पुतळाही जाळला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.Bajrang Dal burns statue of Santa Claus; Murdabad’s announcement


    विशेष प्रतिनिधी

    उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राष्ट्रीय बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेने सांता क्लॉज मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांता क्लॉजच्या पुतळ्यावर पेट्रोल टाकून पुतळाही जाळला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये देखील अशा घटना घडल्याचं समोर आलं आहे.

    बजरंग दलाने ख्रिसमस सणाला विरोध केला आहे.बजरंग दलाने म्हटले आहे की , सांता क्लॉज किंवा ख्रिसमसच्या नावावर लोकांची दिशाभूल केली जात आहे.तसेच धर्मातरणासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप बजरंग दलाने केला आहे.तसेच हिंदूंनी यापासून सावध राहावं , या देशात केवळ हिंदूत्व चालेल असंही म्हटलंय.



    दरम्यान, कर्नाटकमध्ये मांडया जिल्ह्यात एका शाळेत सुरू असलेल्या ख्रिसमसचा कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला. हे कार्यकर्ते निर्मला इंग्लिश स्कुल अँड कॉलेजमध्ये शिरले आणि त्यांनी विरोध केला. तसेच शाळा हिंदू सण साजरे करत नाहीत, असा आरोपही केला.

    Bajrang Dal burns statue of Santa Claus; Murdabad’s announcement

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही