वृत्तसंस्था
बेंगलोर : जय बजरंग बली : कर्नाटकात बजरंग दलावर बंदी, काँग्रेसने खाल्ली हापटी!!, अशी अवस्था येऊन ठेपली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या दहशतवादी संघटनेवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीचा सूड उगवण्यासाठी बजरंग दलावर बंदी घालण्याचा आश्वासन जाहीरनाम्यात दिले, पण आता हे शब्द मागे घेऊन पूर्णपणे हापटी खाण्याचा प्रसंग काँग्रेसवर आला आहे.Bajrang Dal banned in Karnataka; Congress has eaten up; Say, Jai Bajrang Bali!!
बजरंग दलावर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. राज्य सरकार तसे कधी करूही शकत नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय कायदेमंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनी काँग्रेस नेत्यांना झापले आहे.
काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देताच राजस्थान, छत्तीसगडमध्येही बजरंग दलावर बंदी घालण्याचे आवाज उठले. पण त्यावर देशभरातले बजरंग दलाचे कार्यकर्ते संतापून उठले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभांचा प्रारंभ “बजरंग बली की जय”ने सुरू केला. त्यामुळे सुरुवातीला काँग्रेस नेत्यांनी बजरंग बली आणि बजरंग दल यात भेद मांडून पाहिला, पण तरी काँग्रेसविरुद्धचा संताप उफाळल्याचेच दिसून आले. त्यामुळे अखेर काँग्रेसलाच बजरंग दलावरच्या बंदीच्या मुद्द्यावर हपटी खावी लागली आणि एम. वीरप्पा मोईली यांनी काँग्रेस नेत्यांना जमिनीवर आणले.
आम्ही कधीच बजरंग दलावर बंदी आणू, असे म्हटले नव्हते. बजरंग दल आणि पीएफआय यांच्यासारख्या संघटना समाजात तेढ निर्माण करतात एवढेच आमचे म्हणणे आहे. राज्य सरकार बजरंग दलावर बंदी घालू शकत नाही. मी केंद्रात कायदेमंत्री होतो. राज्य सरकार अशी कुठल्या संघटनेवर बंदी आणू शकत नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले तरी बजरंग दलावर बंदी आणण्याचा प्रश्नच नाही. बजरंग दलावर बंदीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाबाबत काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार स्पष्टीकरण देतील, असे वीरप्पा मोहिनी यांनी स्पष्ट करून काँग्रेस कशी तोंडावर पडली, हेच उघड केले.
Bajrang Dal banned in Karnataka; Congress has eaten up; Say, Jai Bajrang Bali!!
महत्वाच्या बातम्या
- कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष नाही!!; याचा अर्थ 2024 पर्यंत पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष??; बाकीच्या फॉर्म्युल्यात बाळासाहेबांची कॉपी??
- मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य वाटतो; उद्धव ठाकरेंचे पवारांना प्रत्युत्तर
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत शरद पवारांचं मोठं विधान! कार्यकर्त्यांना म्हणाले ‘’दोन दिवसानंतर तुम्हाला…’’
- Colonial loot : ब्रिटीशांनी भारतातून ‘कोहिनूर’सह मौल्यवान रत्न कशी लुटली?