Monday, 12 May 2025
  • Download App
    Ambedkar Yatra : ‘देखो अपना देश’ या उपक्रमाअंतर्गत 'IRCTC'कडून 'आंबेडकर यात्रा' या विशेष पॅकेजची घोषणा!Babasaheb Ambedkar Yatra  Announcement of special package Ambedkar Yatra from IRCTC under the initiative Dekho Apna Desh

    Ambedkar Yatra : ‘देखो अपना देश’ या उपक्रमाअंतर्गत ‘IRCTC’कडून ‘आंबेडकर यात्रा’ या विशेष पॅकेजची घोषणा!

    Aambedkar and Bharat Gavrao train

    (संग्रहित)

    येत्या १४ एप्रिलापासून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे.

    प्रतिनिधी

    राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि बौद्ध वारसा स्थळं देशभरातली पर्यटकांना पाहता यावीत, या उद्देशाने रेल्वेच्या आयआरसीटीसी लिमिटेडने भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे ‘देखो अपना देश’ या उपक्रमाअंतर्गत विशेष ‘आंबेडकर यात्रा’ पॅकेजची निर्मिती केली आहे, येत्या १४ एप्रिलापासून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. Babasaheb Ambedkar Yatra  Announcement of special package Ambedkar Yatra from IRCTC under the initiative Dekho Apna Desh

    या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याशी संबंधित काही महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांचे दर्शन प्रवाशांना घेता येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर पॅकेज यात्रेअंतर्गत, पहिला प्रवास 14 एप्रिल 2023 पासून नवी दिल्लीहून सुरू होईल. ही यात्रा ७ रात्र ८ दिवस असणार आहे. त्यासाठी दिल्ली, सफदरजंग, मथुरा आणि आग्रा येथून प्रवाशांना या ट्रेनमध्ये चढता येणार आहे.


    भारताला गुलाम बनविणाऱ्या देशात जाऊन राहुल गांधींचे भारतद्वेषी भाषण; स्मृती इराणींचा घणाघात


    पहिला थांबा मध्यप्रदेशात महू – या डॉ.आंबेडकरांच्या जन्मस्थळी (भीमजन्म भूमी )असेल, त्यानंतर ही गाडी नागपूरला जाणार या ठिकाणी प्रवासी दीक्षाभूमी या बौद्ध पंथाच्या पवित्र स्थळाला भेट द्यायला जाऊ शकतील. पुढे ही गाडी नागपूरहून सांची इथे जाईल. सांचीच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये सुप्रसिद्ध सांची स्तूप आणि इतर बौद्ध स्थळांना भेट देता येईल. त्यापुढे सारनाथ आणि वाराणसीला काशी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनानंतर शेवटी ही ट्रेन गया इथे जाईल. इथे पर्यटकांना प्रसिद्ध महाबोधी मंदिर आणि इतर बौद्धमठांना भेट देण्यासाठी नेले जाईल.

    यावेळी या मार्गावरील राजगीर आणि नालंदा आणखी दोन महत्त्वाची बौद्ध स्थळेही दाखवली जातील. हा पर्यटन दौरा शेवटी नवी दिल्लीला येऊन संपेल. पर्यटकांना दिल्ली, मथुरा आणि आग्रा कँट स्थानकात ट्रेनमध्ये चढण्या-उतरण्याचा पर्याय असेल. या यात्रेत एका प्रवाशासाठी २९ हजार ४४० रुपये, दोन किंवा तीन प्रवासी असल्यास प्रत्येक प्रवाशाला २१ हजार ६५०, ५ ते ११ प्रवासी असल्यास २० हजार ३८० रुपये इतका तिकीट दर असणार आहेत. यात प्रवाशाचे राहणे व नाष्टा आणि जेवणाचा समावेश आहे.

    Babasaheb Ambedkar Yatra  Announcement of special package Ambedkar Yatra from IRCTC under the initiative Dekho Apna Desh

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Jaipur Police : जयपूरमध्ये महामार्गावर एका पिकअपमध्ये 2075 किलो स्फोटके सापडली; पोलिसांनी वाहन जप्त केले; तपास सुरू

    Vikram Misri : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एक्स अकाउंट प्रायव्हेट केले; युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर ट्रोलिंग सुरू झाले

    Operation sindoor : सुरुवातीला 7, नंतर 11 आणि आज 14, ठोकले कराची ते इस्लामाबाद; भारताने टप्प्याटप्प्याने उलगडली हवाई हल्ल्यांची मालिका!!

    Icon News Hub