• Download App
    बाबा राम रहीमचे 40 लाख अनुयायांना भाजपला मत देण्याचे फर्मान?; आज रात्री होणार कोडवर्ड; "भास्कर"च्या बातमी दावा!! Baba Ram Rahim's order for 40 lakh followers to vote for BJP

    बाबा राम रहीमचे 40 लाख अनुयायांना भाजपला मत देण्याचे फर्मान?; आज रात्री होणार कोडवर्ड; “भास्कर”च्या बातमी दावा!!

    प्रतिनिधी

    चंदिगड : वादग्रस्त बाबा राम रहीम यांनी आपल्या अनुयायांना पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपला मत देण्याचे फर्मान सोडले आहे. अर्थात हे फर्मान गुप्तपणे सोडले असून आज रात्री कोडवर्ड जारी होणार आहे अशी बातमी भास्कर समूहाने दिली आहे.Baba Ram Rahim’s order for 40 lakh followers to vote for BJP

    बाबा राम रहीम यांची नुकतीच तुरुंगातून फर्लोवल सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर त्याने आपल्या सुमारे 40 लाख अनुयायांना भाजपला मत देण्याचे फर्मान सोडल्याची ही बातमी आहे. अर्थात या बातमीत कोणताही सोर्स नमूद करण्यात आलेला नाही.



    पंजाब मधल्या सामना विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार परमजीत सिंह कोहली यांनी बाबा राम रहीम याच्या सुटके संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे भाजपने बाबा राम रहीम यांना मुद्दामून फर्लोवर सोडले आहे. भाजपचा बाबा राम रहीमशी मतांसाठी सौदा झाला आहे, असा दावा त्यात करण्यात आला आहे.

    या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या मतदानात बाबा राम रहीम यांचे 40 लाख अनुयायी तथाकथित फर्मानानुसार भाजपला मतदान करणार की ते फार्मान निघणारच नाही? याविषयी राजकीय वर्तुळात साशंकता देखील व्यक्त होत आहे.

    बाबा राम रहीम यांचे 40 लाख अनुयायी पंजाब मधल्या एकूण 117 पैकी 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभावी ठरू शकतात, असा दावाही बातमीत करण्यात आला आहे.

    Baba Ram Rahim’s order for 40 lakh followers to vote for BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!