Shri Ram Temple construction : अयोध्येच्या रामजन्मभूमी संकुलात भव्य राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने भाविकांनी रामललासाठी मुक्तहस्ते दान केले आहे. ट्रस्टशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने आज तकने सांगितले आहे की, रामभक्तांनी केवळ मंदिर बांधण्यासाठी देशभरात सुरू केलेल्या समर्पण निधी मोहिमेमधून सुमारे 700 कोटी रुपये समर्पित केले आहेत. या मोठ्या रकमेपैकी ट्रस्टला एसबीआयच्या अयोध्या शाखेत 500 कोटींची एफडीही केली आहे. Ayodhya Heavy Donations For Shri Ram Temple construction trust FD of 500 crores Rupees
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : अयोध्येच्या रामजन्मभूमी संकुलात भव्य राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने भाविकांनी रामललासाठी मुक्तहस्ते दान केले आहे. ट्रस्टशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने आज तकने सांगितले आहे की, रामभक्तांनी केवळ मंदिर बांधण्यासाठी देशभरात सुरू केलेल्या समर्पण निधी मोहिमेमधून सुमारे 700 कोटी रुपये समर्पित केले आहेत. या मोठ्या रकमेपैकी ट्रस्टला एसबीआयच्या अयोध्या शाखेत 500 कोटींची एफडीही केली आहे.
आता रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची नजर भारताबाहेरील परदेशी देणगीदारांवर आहे. यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर ट्रस्टने दिल्ली स्थित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत खातेही उघडले आहे. हे खाते चालवण्याची जबाबदारी तीन लोकांवर सोपविण्यात आली आहे.
जानेवारीत मोहीम सुरू झाली
ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व कामे महासचिव चंपत राय पाहत आहेत. दुसरे म्हणजे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा आणि ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी आहेत. यापैकी कोणत्याही दोन सदस्यांच्या सहमतीने खात्यांचे संचालन होते.
15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत देशभरातील रामजन्मभूमी मंदिर निर्मितीसाठी निधी समर्पण मोहीम राबविली गेली. विशेष बाब म्हणजे देशभरात बऱ्याच ठिकाणी मुस्लिमांनीही निधी समर्पण मोहिमेत भाग घेतला होता आणि समर्पण निधी दिला.
अयोध्येतच सामाजिक कार्यकर्ते बबलू खान यांच्या नेतृत्वात निधी समर्पण मोहीम सुरू केली गेली, ज्यात शेकडो लोकांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे बाबरी मशिदीचे पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनीही मंदिराच्या बांधकामासाठी छुपे दान दिले. याखेरीज अनेक नामवंत मुस्लिम चेहरे अयोध्येत आले होते आणि त्यांनीही निधी दिला होता. देशाच्या इतर भागातही असेच घडत होते.
मोजण्यासाठी मोठी टीम
निधी समर्पण अभियान संपल्यानंतर जिल्हास्तरावर गोळा झालेल्या निधीचे ऑडिट करण्याचे काम देशभर सुरू झाले. यासाठी एक मोठी टीम तयार केली गेली, ज्यात अनेक चार्टर्ड अकाउंटंट होते. यावेळी निधी समर्पण मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात असेही धनादेश आढळून आले, जे काही तांत्रिक कारणांमुळे वटवले जाऊ शकले नाही. म्हणून वरील देणगीदारांशी संपर्क साधून असे धनादेश क्लिअर करण्यात आले. ऑडिटचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही. तथापि, आतापर्यंतचा लेखापरीक्षण अहवाल ट्रस्टच्या सदस्यांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.
Ayodhya Heavy Donations For Shri Ram Temple construction trust FD of 500 crores Rupees
महत्त्वाच्या बातम्या
- G7 मध्ये आज पीएम मोदींचे व्हर्च्युअल संबोधन, कोरोनामुक्त जगासह अनेक मुद्द्यांवर होणार व्यक्त
- दिग्विजय सिंहांची क्लब हाऊस चॅट व्हायरल, म्हणाले- काँग्रेस सत्तेत आल्यावर पुन्हा बहाल होणार कलम 370!
- एमस्ची आयएनआय सीईटी पुढे ढकलण्याचे न्यायालयाच आदेश
- साखरेला पर्याय ठरणार अमाई प्रथिने, जगात वेगाने संशोधन
- राजस्थानात सचिन पायलट पुन्हा नाराज, कॉंग्रेसमध्ये खळबळ, मनधरणी सुरु