वृत्तसंस्था
हैदराबाद : बॉलिवूड मध्ये कार्यरत महेश भट्ट आणि त्यांच्या फॅमिलीचे लिबरल्सशी असलेले नाते सर्वश्रुत आहे. या सर्व लिबरल्सना सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे प्रचंड आकर्षण वाटू लागले आहे. या आकर्षणातूनच बॉलीवूड पासून बराच काळ दूर राहिलेली अभिनेत्री पूजा भट्ट या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाली आहे. Away from Bollywood, Pooja Bhatt joins Bharat Jodo Yatra
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. काल सायंकाळी हैदराबाद मध्ये घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर शरसंधान साधले. त्यांच्यात राजकीय साटेलोटे असल्याचा आरोप केला. आज सकाळी त्यांनी भारत जोडो यात्रेची पुढची वाटचाल सुरू केली. या वाटचालीतच अभिनेत्री पूजा भट्ट राहुल गांधी यांच्या बरोबर चालत सामील झाली.
भारत जोडो यात्रेमध्ये लिबरल्स मोठ्या प्रमाणावर सामील होताना दिसत आहेत. स्वराज चळवळीचे नेते आणि माजी पत्रकार योगेंद्र यादव हे अधून मधून भारत जोडो यात्रेत दिसतात. भारत जोडो यात्रेची सुरुवात कन्याकुमारीतून झाली, तेव्हा आणि केरळमध्ये देखील त्यांचा यात्रेत समावेश होता. दरम्यानच्या काळात ते यात्रेत दिसले नाहीत. मात्र आज या लिबरल्स पैकी अभिनेत्री पूजा भट्ट राहुल गांधीं समावेत भारत जोडो यात्रेत सामील झाली.
Away from Bollywood, Pooja Bhatt joins Bharat Jodo Yatra
महत्वाच्या बातम्या