• Download App
    जिंकलंस भावा! : ऑस्ट्रेलियन खेळाडूची पीएम केअर्समध्ये 50 हजार डॉलर्सची मदत, भारतीय सेलिब्रिटी मात्र टीका करण्यातच धन्य । Australian Cricket player Pat Cummins donates 50000 USD to PM cares fund for oxygen supply

    जिंकलंस भावा! : ऑस्ट्रेलियन खेळाडूची पीएम केअर्समध्ये ५० हजार डॉलर्सची मदत, भारतीय सेलिब्रिटी मात्र टीका करण्यातच धन्य

    Pat Cummins donates 50000 USD to PM cares : आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारतातील अनेक शहरांमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे तब्बल 37 लाखांची मदत जाहीर केली आहे. गरजूंना मदत करण्यासाठी पॅटने पीएम केअर्स फंडमध्ये 50 हजार डॉलर्स देण्याचे ठरविले आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून लिहिले की, ‘भारत हा असा देश आहे जिथे मला कित्येक वर्षांपासून खूप प्रेम मिळाले आहे. येथील लोकही खूप प्रेमळ आहेत. मला माहिती आहे की, कोरोना विषाणूमुळे देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेसह अनेक समस्या आहेत. यामुळे एक खेळाडू या नात्याने मी पीएम केअर्स फंडमध्ये 50 हजार यूएस डॉलर्स (जवळजवळ 37 लाख रुपये) देऊ इच्छितो.” Australian Cricket player Pat Cummins donates 50000 USD to PM cares fund for oxygen supply


    वृत्तसंस्था

    मुंबई : आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारतातील अनेक शहरांमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे तब्बल 37 लाखांची मदत जाहीर केली आहे. गरजूंना मदत करण्यासाठी पॅटने पीएम केअर्स फंडमध्ये 50 हजार डॉलर्स देण्याचे ठरविले आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून लिहिले की, ‘भारत हा असा देश आहे जिथे मला कित्येक वर्षांपासून खूप प्रेम मिळाले आहे. येथील लोकही खूप प्रेमळ आहेत. मला माहिती आहे की, कोरोना विषाणूमुळे देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेसह अनेक समस्या आहेत. यामुळे एक खेळाडू या नात्याने मी पीएम केअर्स फंडमध्ये 50 हजार यूएस डॉलर्स (जवळजवळ 37 लाख रुपये) देऊ इच्छितो.”

    पॅटने पुढे असेही लिहिले की, मी माझ्या सहकारी खेळाडूंनाही मदतीसाठी पुढे यावे अशी विनंती करतो. सध्या प्रत्येकाला असहाय वाटत आहे. कदाचित मला उशीर झाला असेल परंतु याद्वारे आपण लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करू.’ शेवटी त्याने लिहिले की, जरी माझी मदत मोठी नसली तरी ती एखाद्याचे आयुष्य बदलू शकते.”

    दुसरीकडे, भारतीय सेलिब्रिटींकडून मात्र सरकारला मदत करण्याबाबत उदासीनता दिसून आहे. अपवाद अक्षय कुमारचा. त्याने नुकतेच एक कोटींची मदत जाहीर केली आहे. इतर बॉलीवूड सेलिब्रिटी मात्र वेगवेगळ्या देशात व्हॅकेशन एन्जॉय करण्यातच व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. भारतातील सध्याच्या संकटावरून संवेदनशील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीनेही नुकतेच सेलिब्रिटींच्या अशा मौजमजेवरून त्यांना फटकारले होते. पॅट कमिन्ससारखा दानशूरपणा भारतीय क्रिकेटपटू व फिल्मी कलाकारही दाखवतील, अशीच सर्वसामान्यांना अपेक्षा आहे. संकटाच्या हा काळ देशासोबत उभे राहण्याचा आहे, टीका करण्याचा नाही, हेही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. पण उलट अनेक सेलिब्रिटी मात्र सरकारच्या प्रयत्नांना साथ द्यायची सोडून टीका करण्यातच धन्यता मानताना दिसून येत आहे.

    भारतातील कोरोनाच्या उद्रेकामुळे अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल 2021 मधून नावे मागे घेतली आहेत. अँड्र्यू टाय, अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी आयपीएलच्या या हंगामातून आपली नावे मागे घेतली आहेत. झम्पा आणि रिचर्डसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतात. तथापि, हे दोन खेळाडू स्पर्धेतून माघार घेत असूनही ग्लेन मॅक्सवेल, डॅन क्रिस्टियन आणि डॅनियल सॅम्स यांच्या रूपात आणखी तीन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आरसीबी संघात आहेत. आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यासारख्या मोठ्या नावांचा समावेश असून, एकूण 14 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आयपीएल 2021 मध्ये खेळत आहेत.

    Australian Cricket player Pat Cummins donates 50000 USD to PM cares fund for oxygen supply

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती