विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या घटनेचा व्हिडीओ आपल्याकडे असून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.Attempt to blackmail Union Home Minister, threat to make Lakhimpur Kheri violence video viral
पोलीसांनी याप्रकरणी चौघा तरुणांना अटक केली आहे. मंत्री अजयकुमार मिश्रा टेनी यांच्या कर्मचाºयांनी याबाबत तक्रार दिली आहे.चौघेही उच्चशिक्षित आहेत. कबीर कुमार, अमित शर्मा, अमित कुमार, निशांत कुमार आणि अश्विनी कुमार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
त्यापैकी दोन जण पदवीचे शिक्षण घेत आहेत. दुसरे दोघे एका खासगी कंपनीत काम करत आहेत. लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या संपूर्ण घटनेची बातमी पाहिल्यानंतर त्यांनी टेनी यांना ब्लॅकमेल करण्याचा डाव आखला. शेतकºयांच्या मोर्चावर गाडी घातल्याप्रकरणी टेनी यांचा मुलगा अटकेत आहे.
यामध्ये चार शेतकर्यासह आठ जण ठार झाले होते. 3 आॅक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेशी संबंधित व्हिडीओ आपल्याकडे आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा यांच्या कर्मचार्यांकडून त्यांना तक्रार मिळाली होती की
अज्ञात व्यक्तींकडून या घटनेशी संबंधित व्हिडिओ जारी करण्याची किंवा प्रकरण मिटवण्यासाठी अडीच कोटी रुपये देण्याची धमकी देणारा फोन आला होता. तक्रारीनंतर नवी दिल्ली जिल्ह्यातील नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांना आढळले की व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलद्वारे कॉल केले गेले होते. सायबर विभागाच्या सहकार्याने पोलिसांनी चार आरोपींना नोएडातून आणि एकाला दिल्लीतून अटक केली.
Attempt to blackmail Union Home Minister, threat to make Lakhimpur Kheri violence video viral
महत्त्वाच्या बातम्या
- लष्कराचे मिग-21 विमान कोसळले, पायलटचा मृत्यू
- महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध, रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश
- हद्दीत घुसणाऱ्यांनाच नाही सीमेपलीकडील दहशतवाद्यांनाचाही खात्मा करू शकतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
- बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या ब्राम्हणांना शिव्या
- पवार घराण्यावर विश्वास ठेऊ नका असे सांगितले होते, गोपीचंद पडळकर यांची टीका
- खोट्या अॅट्रॉसिटींना बसणार चाप, साक्षीदार नसेल तर गुन्हा ठरू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल