वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बांगलादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंदू समाजावर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये पाच जण मारले गेले. बांगलादेशच्या शेख हसिना वाजेद सरकारने सुमारे साडेचारशे जणांना अटक केली आहे. परंतु हिंदूंवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भारताची सरकारची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप पुढे दिसलेली नाही. Attacks on Hindus in Bangladesh; The central government has no official response; Bangladesh Navy Chief Welcomes to Delhi
या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे नौदल प्रमुख ऍडमिरल मोहम्मद शाहीन इक्बाल भारताच्या दौर्यावर आले आहेत. त्यांनी आज सकाळी नॅशनल वॉर मेमोरियल येथे जाऊन भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ऍडमिरल मोहम्मद शाहीन इक्बाल यांनी भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची आर्मी हेड क्वार्टर्स मध्ये भेट घेतली.
दोन्ही देशांच्या लष्करी आणि नौदल संबंधांबद्दल दोन्ही प्रमुखांनी चर्चा केली. 1971 मध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली. भारताने पाकिस्तानशी युद्ध जिंकून बांगलादेशला स्वतंत्र केले. या बांगलादेश निर्मितीचे हे 50 वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर नौदल प्रमुख मोहम्मद शाहीन इक्बाल यांची ही भारत भेट आहे.
परंतु बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असताना भारत सरकारने अजून कोणतीही प्रतिक्रिया देखील व्यक्त न करणे याविषयी मात्र सोशल मीडियावर संताप व्यक्त होताना दिसत आहे. याउलट बांगलादेशाच्या नवदल प्रमुखांचे अधिकृतरित्या दिल्लीत स्वागत होतानाही दिसत आहे, यावर नेटिझन्सनी टीकाटिप्पण्या केल्या आहेत.
Attacks on Hindus in Bangladesh; The central government has no official response; Bangladesh Navy Chief Welcomes to Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- चीन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिअंट, रुग्णसंख्या वाढली; रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू
- कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या हालचाली गतिमान, लसीकरण वेगाने होण्यासाठी प्रयत्न
- आर्यन खानला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा , शाहरुख खानला दिला सल्ला ; राज्यमंत्री रामदास आठवले –
- साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्याजवळ एसटी बस भस्मसात, प्रवासी सुखरूप
- वैद्यकशास्त्रातील क्रांतिकारक प्रयोग अमेरिकेत यशस्वी , डुकराच्या किडनीचे मनुष्यात प्रत्यारोपण