बांगलादेशातील हिंदूविरोधी भावना गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने उग्र होत आहेत. बांगलादेशातील हिंदू मुलींवर अत्याचार, त्यांचे बळजबरीने धर्मांतर, हिंदू पुरुषांची हत्या तसेच हिंदुंची धर्मस्थळे, दुकाने यावर हल्ले यामुळे बांगलादेशातील हिंदू भयग्रस्त आहे. दुर्गापुजेच्या निमित्ताने बांगलादेशींच्या हिंदुविरोधी भावना उफाळून आल्या. ‘Attacks on Durga Puja pandals pre-planned’: Bangladesh home minister The violence broke out in Bangladesh over the alleged desecration of the Quran at a pandal during Durga Puja festivities.
वृत्तसंस्था
ढाका : बांगलादेशमध्ये दुर्गापूजेच्या उत्सवाच्या वेळी एका मंडपात कुरानची विटंबना केल्याची बतावणी करत हिंदूंविरोधी आगडोंब उसळवण्यात आला. मुळात दुर्गापूजेच्या उत्सवात मुस्लिमांचा कुरान धर्मग्रंथ का आणला जाईल, एवढा साधा विचार नजरेआड करुन नियोजनबद्ध हिंसाचार करण्यात आला. यात बांगलादेशातील इस्कॉन मंदिरासह अनेक मंडप आणि मंदिरांवर हल्ले करण्यात आले. हिंदूंच्या दुकानांची आणि घरांचीही तोडफोड करण्यात आली.
यावर बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी दुर्गा पूजा मंडपांवरील हल्ले आणि हिंदुंची घरे-दुकानांवरील हल्ले ‘पूर्वनियोजित’ होते असे म्हटले आहे. देशातील सांप्रदायिक सलोखा नष्ट करण्याचा हा हेतू होता, असे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेश पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुंवरील हिंसाचाराच्या संदर्भात 4 हजारांहून अधिक लोकांवर गुन्हा दाखल केले आहेत. त्यानंतर बांगलादेशी गृहमंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे.
बांगलादेशातील हिंदूविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या सीएए कायद्याचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. मोदी सरकारने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातील अत्याचारांना कंटाळून भारतात येणाऱ्या गैरमुस्लिमांना नागरिकत्व देण्याची मोहिम सुुर केली. मात्र त्याला राजकीय विश्लेषक आणि मुस्लिम लांगुलचालन करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांनी वेगळे रुप देण्याचा प्रयत्न केला. भारताबाहेर राहणाऱ्या हिंदुंना भारताशिवाय अन्य कोणता देश आसरा देऊ शकतो, असा प्रश्न मोदी सरकारनेक केला होता. त्याकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आले.
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेच्या उत्सवात मुस्लिम कट्टरवाद्यांनी हैदोस घातला. त्यासाठी दुर्गापुजा मंडपात कुराणाची विटंबना करण्यात आल्याची अफवा पसरवण्यात आली. या अफवेच्या आधारे इस्कॉन मंदिरांसह अनेक मंडपांमध्ये, मंदिरांवर हल्ले करण्यात आले. मंदिरे जाळण्यात आली. हिंदुंच्या दुकानांची आणि घरांची तोडफोड करण्यात आली. चांदपूर, चटगांव, गाझीपूर, बंदरबन, चापैनवाबगंज आणि मौलवीबाजारमध्ये संघर्ष उफाळला. यात अनेक हिंदुंची हत्या करण्यात आली, असे वृत्त बांगलादेशातील ढाका ट्रिब्यून या वृत्तपत्राने दिली आहे.
मात्र किती हिंदुंचा बळी गेला तसेच किती मंदिरे, दुकानांची तोडफोड झाली याची माहिती यात देण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगमगंज पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यासह एकाचा मृत्यू झाला आणि 17 जण जखमी झाले. प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा असल्याचे बांगलादेशी हिंदुंचे म्हणणे आहे.
‘Attacks on Durga Puja pandals pre-planned’: Bangladesh home minister The violence broke out in Bangladesh over the alleged desecration of the Quran at a pandal during Durga Puja festivities.
महत्त्वाच्या बातम्या
- भारत आणि बेने इस्रायलींची नाळ एकच
- केंद्र सरकार कायदा करून शेतकऱ्यांना एमएसपी गॅरंटी का देत नाही? मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल सिंग यांचा खोचक सवाल
- चीनची अर्थव्यवस्था संकटात, तिसऱ्या तिमाहीत जोरदार धक्का; रिअल इस्टेटमुळे आर्थिक प्रगतीत अडथळे
- काश्मिरातील टार्गेट किलिंगवर सत्यपाल मलिक यांचा संताप, म्हणाले, “मी राज्यपाल असताना अतिरेक्यांची हिंमत नव्हती!”
- केरळमध्ये मुसळधार पाऊस, पुरामुळे हाहाकार, आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू, घरे पाण्यात वाहून गेली, 11 जिल्ह्यांसाठी अलर्ट