Attack on Union minister Som Prakash :भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश काल पंजाब दौर्यावर होते, त्यावेळी होशियारपूरमधील त्यांच्या ताफ्यावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित पंजाब पोलिसांनी हल्ला रोखण्याचा साधा प्रयत्नही केला नाही, हे विशेष. यावरून पंजाब पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Attack on Union minister Som Prakash convoy in Punjab in Front Of Punjab Police
विशेष प्रतिनिधी
होशियारपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश काल पंजाब दौर्यावर होते, त्यावेळी होशियारपूरमधील त्यांच्या ताफ्यावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित पंजाब पोलिसांनी हल्ला रोखण्याचा साधा प्रयत्नही केला नाही, हे विशेष. यावरून पंजाब पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओनुसार, मोठ्या संख्येने हल्लेखोर केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याकडे धावत असल्याचे दिसून येत आहे, परंतु पंजाब पोलीस उभे राहून सर्व पाहत आहेत. केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये विज्ञान भवन येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री सोम प्रकाश उपस्थित होते.
पंजाब भाजपचे प्रभारी आणि ज्येष्ठ नेते दुष्यंत कुमार गौतम यांनी लिहिले की, नाकर्त्या कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारने आधी आमदार आणि आता केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांच्यावर जीवघेणा हल्ला घडवला आहे. मी याचा तीव्र निषेध करतो आणि केंद्र सरकारने पंजाबात राष्ट्रपती शासन लावण्याचा आग्रह करतो.
केंद्रीय मंत्र्यांवरील हल्ल्याचा पंजाब भाजपने तीव्र निषेध केला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. पंजाब भाजपने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाशजी यांच्या होशियारपूरमधील ताफ्यावर हल्ला. मूकदर्शक बनून पंजाब पोलीस पाहत राहिले. पंजाब भाजपने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नैतिक कारणास्तव राजीनामा द्यावा.
पंजाब भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुभाष शर्मा यांनी ट्विट केले की, “पंजाबमध्ये केंद्रीय मंत्री सोम प्रकाशजींवर कॉंग्रेसच्या गुंडांनी केलेला हल्ला हा निंदनीय आहे, त्यांनी पुढे लिहिले, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग जी तुम्ही अशा प्रकारे भाजपला रोखू शकत नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करत त्यांनी लिहिले की, पंजाब सरकारला हटवण्याची वेळ आली आहे.
Attack on Union minister Som Prakash convoy in Punjab in Front Of Punjab Police
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुक वापरताय, सावधान?, तुमच्या माहितीवर हॅकर्सकडून डल्ला मारण्याचा वाढता धोका
- कॉंग्रेसचे नेते सुधाकर यांच्या खात्यातून त्या युवतीला पैसे?, जारकीहोळी प्रकरणाला गंभीर राजकीय वळण
- महाराष्ट्र, पंजाबमधील कोरोना रोखण्यासाठी मोदींनी दिला कानमंत्र, पंचसूत्रीचा वापर करण्याचे आदेश
- मुंबईच्या विमानतळावर आता अवघ्या ६०० रुपयांत आरटीपीसीआर चाचणी, प्रवाशांच्या खर्चात होणार बचत
- पुदुच्चेरीत नारायणस्वामी यांनाच तिकीट नाकारले, कॉंग्रेसच्य नेतृत्वावारून तर्कवितर्कांना उधाण