विशेष प्रतिनिधी
लखनऊ : अखिलेश सिंह यांनी समाजवादी पाटीर्ची सूत्रे हाती घेतल्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते अमर सिंह, जया प्रदा यांना घरचा रस्ता दाखविला. मात्र, अमर सिंह यांच्याच सांगण्यावरून मुलायम सिंह यादव यांनी पक्षाची सूत्रे अखिलेश यादव यांच्याकडे दिली होती. त्याला ज्येष्ठ अभिनेत्री आणि पक्षाच्या खासदार जया प्रदा यांचाही पाठिंबा होता. वयाने ज्येष्ठ असले तरी नेत्यांच्या पाया पडायचे नाही असा तेव्हा मिळालेला मंत्रही अखिलेश यांनी पाळला.At the behest of Amar Singh, Mulayam Singh Yadav handed over the party’s slogans to Akhilesh Yadav.
लेखिका प्रिया सहगल यांनी समाजवादी पक्षाचा इतिहास आपल्या ह्यद कटेंडर्सह्ण या पुस्तकात उलगडला आहे. त्यांनी म्हटले आहे की उत्तर प्रदेशात २००७ मध्ये मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने स्वबळाव सत्ता स्थापन केली. या निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात समाजवादी पक्ष सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
मग हे आक्रित कसे घडले याचा उलगडा मुलायम सिंह यादव यांना होत नव्हता. त्यांची याबाबत अमर सिंह यांच्याशी भेट झाली. यावेळी अमर सिंह म्हणाले आताच्या तरुणांच्या आशा-आकांक्षा आणि भाषा आपल्याला समजत नाही. त्यासाठी तरुण नेत्याच्या हाती पक्षाची सूत्रे द्यायला हवीत. मुलायम सिंह सुरूवातीला तयार नव्हते.
पण अमर सिंह यांनी त्यासाठी शक्कल लढविली. त्यांनी आपल्या जुळ्या मुलींना बोलावले आणि विचारले की त्यांची आवडती टीव्ही मालिका कोणती आहे. यावर त्यांच्या मुलीने उत्तर दिले की हाना मोंटेना. मुलायम सिंह यांनी हे नावही ऐकले नव्हते. त्यांना रामायण, महाभारत, चंद्रकांता याच मालिका माहित होत्या. अमर सिंह यांनी त्यांना दाखवून दिले की तरुणांप्रमाणे आपण विचार करत नाही.
समाजवादी पार्टीचे चाणक्य समजले जाणारे जनेश्वर मिश्रा यांच्याशीही मुलायम सिंह यांनी चर्चा केली. त्यांनीही नव्या रक्ताला आता पक्षात वाव द्यायला हवा असे सांगितले. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
अखिलेश यादव अगदी लहानपणापासून पक्षाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या पाया पडून ते आदर व्यक्त करत. एकदा जनेश्वर मिश्रा यांच्याही ते पाया पडले. यावेळी मिश्रा यांनी त्यांना मंत्र दिले की, सगळ्यांच्याच पाया पडायला लागलात तर पक्षात शिस्त कशी ठेवणार? तेव्हापासून अगदीच वरिष्ठ नेते सोडून इतरांच्या पाया पडणे अखिलेश यादव यांनी सोडून दिले.
At the behest of Amar Singh, Mulayam Singh Yadav handed over the party’s slogans to Akhilesh Yadav.
महत्त्वाच्या बातम्या
- वीर सावरकरांबद्दल अपुऱ्या माहितीवरून ट्विट करणे ही माझी चूक; भाजप आमदार नितेश राणेंची कबुली
- पाकिस्ताननंतर बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे कट्टरवाद्यांकडून नुकसान
- Corona Vaccine Clinical Trial Data : लसीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
- सरकारने रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून एमएसपीवर आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी केली : पंतप्रधान मोदी