Wednesday, 7 May 2025
  • Download App
    Assembly Election 2022 : मोठ्या सभांवर 22 जानेवारीपर्यंत बंदी, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय । Assembly Election 2022 Ban on large gatherings till January 22, a major decision of the Election Commission due to increasing contagion of corona

    Assembly Election 2022 : मोठ्या सभांवर 22 जानेवारीपर्यंत बंदी, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

    Assembly Election 2022 Ban on large gatherings till January 22, a major decision of the Election Commission due to increasing contagion of corona

    Assembly Election 2022 : विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या सभांवरील बंदी 22 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आज निवडणूक आयोगाने बैठकीत सभांवरील बंदीवर चर्चा करून हा निर्णय मंजूर केला. या बैठकीत कोरोनाचे दिवसेंदिवस वाढत चाललेले रुग्ण आणि सद्य:स्थिती यावर विचारमंथन झाले. याआधी निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून १५ जानेवारीपर्यंत रॅली आणि रोड शोवर बंदी घातली होती. Assembly Election 2022 Ban on large gatherings till January 22, a major decision of the Election Commission due to increasing contagion of corona


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या सभांवरील बंदी 22 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आज निवडणूक आयोगाने बैठकीत सभांवरील बंदीवर चर्चा करून हा निर्णय मंजूर केला. या बैठकीत कोरोनाचे दिवसेंदिवस वाढत चाललेले रुग्ण आणि सद्य:स्थिती यावर विचारमंथन झाले. याआधी निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून १५ जानेवारीपर्यंत रॅली आणि रोड शोवर बंदी घातली होती.

    या बैठकीत सहभागी झालेल्या जवळपास सर्वांनी रॅलींवरील बंदी वाढवण्यास सहमती दर्शवली. सध्या रॅली आणि रोड शोवरील बंदी आठवडाभर वाढवण्यात आली आहे. या बैठकीत समाजवादी पक्षाच्या कार्यालयात गर्दी जमवण्याच्या मुद्द्यावरही केंद्रीय निवडणूक आयोगाने माहिती घेतली आहे. मात्र, छोट्या आणि इनडोअर रॅलींबाबत निवडणूक आयोगाकडून दिलासा देण्यात आला आहे. या रॅलींमध्ये जमणाऱ्यांची संख्या 300 पर्यंत ठेवण्याचे मान्य करण्यात आले आहे. आयोगाने ५० टक्के सभागृहांच्या आसनक्षमतेनुसार सभा घेण्यास परवानगी दिली आहे.

    हा निर्णय घेण्यापूर्वी निवडणूक आयोगाने पाच निवडणूक राज्यांचे आरोग्य सचिव, केंद्रीय आरोग्य सचिव आणि निवडणूक राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यासोबतच निवडणूक कर्तव्यात व्यग्र असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या स्थितीबाबतही माहिती घेण्यात आली.

    निवडणुकीच्या घोषणेच्या वेळी निवडणूक आयोगाकडून 15 जानेवारीपूर्वी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, परिस्थिती सुधारल्यास त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते. आता याबाबत आयोगाने आदेश जारी केला आहे.

    पक्ष आणि नेत्यांना निवडणूक आयोगाकडून घरोघरी जाऊन प्रचार करण्याची सूचना देण्यात आली होती. तसेच तुम्ही तुमचा मुद्दा व्हर्च्युअल पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकता. अनेक पक्षांनी ही मोहीम सुरू केली होती, पण यूपीसारख्या राज्यात रॅलींशिवाय प्रचार कसा करायचा, याची चिंता मोठ्या पक्षांना लागली होती.

    Assembly Election 2022 Ban on large gatherings till January 22, a major decision of the Election Commission due to increasing contagion of corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर- भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला; पाकिस्तानवर एअर स्ट्राइक, 24 क्षेपणास्त्रे डागली, 100 हून जास्त अतिरेकी ठार

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    अहिल्यानगरमध्ये पोलीस वसाहत अन् प्रशासकीय इमारतीच्या विकासासाठी 102 कोटींचा प्रकल्प