नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद जवानांबाबत आसाममधील लेखिकेने गरळ ओकली आहे. जवानांच्या बलिदानाला शहीद कशाला म्हणायचे असा निर्लज्ज सवाल करणाऱ्या लेखिकेला देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.Assam writer arrested for treason on Naxal attack
विशेष प्रतिनिधी
दिसपूर : नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद जवानांबाबत आसाममधील लेखिकेने गरळ ओकली आहे. जवानांच्या बलिदानाला शहीद कशाला म्हणायचे असा निर्लज्ज सवाल करणाऱ्या लेखिकेला देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.
शिखा सरमा असे या लेखिकेचे नाव आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे २२ जवान शहीद झाले आहेत. देशातील प्रत्येक नागरिक या घटनेचा निषेध करत आहे. मात्र आसाममधील एका ४८ वर्षीय लेखिकेने जवानांच्या बलिदानावर फेसबुकवर पोस्ट करत जवानांचा अपमान केला आहे.त्यानंतर मंगळवारी या लेखिकेला देशद्रोहासह अन्य आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
गुवाहाटी पोलीस आयुक्त मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार लेखिका शिखा सरमा यांच्यावर देशद्रोहासह विविध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या लेखिकेला अटक करण्यात आली आहे. शिखा सरमा या लेखिकेने फेसबुकवर लिहिलं होतं की,
पगार घेणारे कामगार जर ड्यूटीवेळी मरत असतील तर त्यांना शहीद कसं बोलू शकतो. याच लॉजिकनुसार जर वीज विभागातील कर्मचारी जो करंट लागून मृत्युमुखी पडतो त्यालाही शहीद म्हटलं पाहिजे. मीडियाच्या लोकांनी भावूक बनू नये.
शिखा सरमाच्या या फेसबुक पोस्टवरून सोशल मीडियात संताप व्यक्त होत आहे. चर्चेचा केंद मोठ्या सोमवारी गुवाहाटी वकील उमी डेका बरुआ आणि कंगकना गोस्वामी यांनी दिसपूर पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात एफआयआर नोंदवली आहे.
तक्रारकर्त्यांनी शिखाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिखाचे विधान हे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. ही पोस्ट राष्ट्र भावनेतून सेवा करणाऱ्यांवर हल्ला आहे. दिसपूर पोलीस स्टेशनने याबाबत तक्रार नोंदवून घेत शिखा सरमाला अटक केली आहे.
Assam writer arrested for treason on Naxal attack
इतर बातम्या वाचा…
- कोरोनावरील लशींच्या बाबतीत भारत जगात भाग्यवान देश, जागतिक बॅंकेचे प्रशस्तीपत्रक
- शेतकऱ्याचा मुलगा, पत्रकार ते भारताचे सरन्यायाधीश, जाणून घ्या न्या. रमणांचा नेत्रदीपक प्रवास
- सुपरस्टार विजय मतदानाला आला चक्क सायकलवरून, फोटोसाठी चाहत्यांकडून पाठलाग
- इस्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांचे नशीब बलवत्तर, बहुमताअभावी सत्तास्थापनेची मिळाली पुन्हा संधी
- योगी आदित्यनाथ सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका, १२० पैकी ९४ एनएसएची प्रकरणे ठरवली रद्दबातल