वृत्तसंस्था
दिसपूर : जागतिक गेंडा दिनी आसाम सरकारने चक्क २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. शिंगात औषधी गुणधर्म असतात, या एका चुकीच्या समज जनतेच्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे सरकारने स्पष्ट केले. Assam government burn 2500 horns on world rhino day
जागतिक गेंडा दिवस २२ सप्टेंबरला केला जातो. त्या दिवशी आसाम सरकारने २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. आसामच्या गोलाघाट जिल्ह्याच्या बोकाखाट भागात एकूण २ हजार ४७९ शिंगं जाळली आहेत. ९४ शिंगं ही संशोधन आणि प्रशिक्षणासाठी ठेवली जाणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनीच हेलिकॉप्टरमधून ही शिंगं जाळण्याची प्रक्रिया सुरू केली. ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करताना हिमंता बिस्व शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे.
Assam government burn 2500 horns on world rhino day
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना जावेद अख्तरना भोवली; दिल्ली-मुंबईत फौजदारी गुन्हे दाखल
- “शिवलीला ताई तुम्ही कीर्तनकार आहात तुमची समाजाला गरज आहे बिग बॉसला नाही” , समर्थक झाले नाराज
- महापालिका वॉर्ड – प्रभाग रचना; अख्ख्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला ना… मग मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील ही फट का ठेवली…??
- पंजाब काँग्रेसमध्ये आता कॅप्टनचेच बंड; म्हणाले- राहुल-प्रियांका अनुभवशून्य, त्यांची सल्लागारांकडूनच दिशाभूल, सिद्धूंविरुद्ध देणार मजबूत उमेदवार!