Assam Election Result LIVE : कोरोना संकटादरम्यान ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या, त्यामध्ये ईशान्येकडील आसामचादेखील समावेश होता. आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. पाच वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षासमोर सत्ता राखण्याचे आव्हान आहे, तर कॉंग्रेसने सत्तेत परत येण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. assam election results live Now Latest Updates bjp vs congerss
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संकटादरम्यान ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या, त्यामध्ये ईशान्येकडील आसामचादेखील समावेश होता. आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. पाच वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षासमोर सत्ता राखण्याचे आव्हान आहे, तर कॉंग्रेसने सत्तेत परत येण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे.
आसाम निकालाचे Live Updates…
07.15 AM : आसाममधील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जे कोणी मोजणी केंद्रांवर येत आहे, त्यांचे तापमान मोजले जात आहे आणि कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे.
आसाममध्ये यावेळी एकूण तीन टप्प्यांत मतदान झाले. राज्यातील एकूण 126 विधानसभा जागांवर 82.04 टक्के मतदान झाले. राज्यात एक किंवा दोन ठिकाणी ईव्हीएमबाबत गोंधळ उडाला असला, तरी हिंसाचाराची कोणतीही घटना घडली नाही.
आसाममध्ये यावेळी भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविली नाही. सर्बानंद सोनोवाल सध्या भाजपचे मुख्यमंत्री आहेत, परंतु यावेळी भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा ठरवलेला नाही. सर्बानंद सोनोवाल आणि हेमंत बिस्वा शर्मा यांची जोडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजपने निवडणूक लढविली.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिकांसाठी राष्ट्रीय नोंदणी हे आसाममध्ये मोठे मुद्दे राहिलेले आहेत. कॉंग्रेसने आश्वासन दिले की सीएए आणणार नाही, त्याच वेळी भाजपने या विषयावर कमी भाष्य केले. आसाममध्ये यावेळी भाजप आसाम गण परिषद, यूपीपीएल, जीएसपीशी युती करणार आहे, तर एआययूडीएफ, बीपीएफ, माकप, भाकप, सीपीआय (एमएल) यासारखे पक्ष कॉंग्रेससोबत आहेत.
काय होता एक्झिट पोल?
assam election results live Now Latest Updates bjp vs congerss
महत्त्वाच्या बातम्या