आसामचे लोक ‘आम’ नसून ‘खास’ असल्याचा लगावला टोला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सरमा म्हणाले की, ‘’आम्ही पाहुण्याला देव मानतो. पण औरंजेब आसाममध्ये आल्यावर त्याला पाहुण्यासारखा सन्मान मिळाला नाही. म्हणूनच मला केजरीवालांना एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही खोटं बोलण्यासाठी इथे आलात तेव्हा आम्ही तुम्हाला काहीच बोललो नाही. यानंतरही आम्ही तुम्हाला जो सन्मान मिळायला हवा होता तो दिला. आम्ही तुम्हाला सुरक्षाही दिली, पण आम्ही दिल्लीत गेल्यावर तुम्ही सुरक्षाही देत नाही. कोविडच्या काळात मी तुम्हाला अनेक लोकांबद्दल ट्विट केले होते. पण तुम्ही एकही उत्तर दिले नाही.’’ Assam Chief Minister Sarma hit back at Kejriwal
याशिवाय ‘’म्हणूनच जास्त बोलू नये. आम्हाला आमच्या हिशोबाने चालू द्या. आज आसाम विकासाच्या दिशेने जात आहे. आणि आम्हाला ‘आप’ नकोय, ‘खास’ बनूनच आम्ही विकास करू. आमचे आसामचे लोक ‘आम’ नाहीत, आमचे आसामचे लोक ‘खास’ आहेत. आम्ही आम आदमी नाही, आम्ही खास लोक आहोत. खास लोक बनूनच आपण पुढे जाऊ. एक दिवस शिक्षण, संस्कृती आणि खेळाने संपूर्ण देश जिंकू, ही माझी इच्छा आहे.’’ असंही सरमा यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले की, ‘’केजरीवाल यांच्यात इथे येऊन माझ्यावर तेच आरोप करण्याची हिंमत नाही, जे त्यांनी दिल्ली विधानसभेत केले होते. मी त्यांना असेच आव्हान देतो. असे लोक विधानसभेतच वीरता दाखवू शकतात कारण त्यांना माहीत आहे की तिथे बोलल्याबद्दल कोणावरही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. जर तुम्ही पुरुष असाल तर पुरुषासारखे बोला, जर तुम्ही स्त्री असाल तर स्त्रीसारखे बोला, परंतु कधीही भित्र्यासारखे बोलू नका’’
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय म्हणाले होते? –
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आसाममधील आपल्या पहिल्या रॅलीत मुख्यमंत्री सरमा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धमकावणं शोभत नाही, असं ते म्हणाले होते. याशिवाय केजरीवाल यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्व क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले होते की, मुख्यमंत्री सरमा यांनी गेल्या सात वर्षांत केवळ गलिच्छ राजकारण केले आहे.
Assam Chief Minister Sarma hit back at Kejriwal
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा