Assam Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालसारखीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आसामची विधानसभा निवडणूक ठरली आहे. ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांत भाजपची सत्ता आहे. आसाममध्ये सध्या भाजपच सत्तेवर आहे. सर्बानंद सोनोवाल मुख्यमंत्री आहेत. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सोनोवाल यांनी राज्यात अनेक चांगली विकासकामे केली, जनतेचे प्रश्न सोडवले. यामुळे येथे भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा धोका नव्हता. परिणामी, एनडीएला येथे मोठी आघाडी मिळाली आहे. Assam Assembly Elections 2021: 10 reasons for BJP’s second victory in Assam, read here
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : पश्चिम बंगालसारखीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आसामची विधानसभा निवडणूक ठरली आहे. ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांत भाजपची सत्ता आहे. आसाममध्ये सध्या भाजपच सत्तेवर आहे. सर्बानंद सोनोवाल मुख्यमंत्री आहेत. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सोनोवाल यांनी राज्यात अनेक चांगली विकासकामे केली, जनतेचे प्रश्न सोडवले. यामुळे येथे भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा धोका नव्हता. परिणामी, एनडीएला येथे मोठी आघाडी मिळाली आहे.
आसाममध्ये भाजपच्या दुसऱ्यांदा विजयाची 10 कारणे
1) मागच्या पाच वर्षांच्या काळात भाजपने केलेली विकासकामे, पायाभूत सुविधांचे आणलेले वेगवेगळे प्रकल्प, कल्याणकारी योजना यामुळे आसामी जनतेचे भाजपला भरभरून मतदान झाले.
2) सर्व स्तरांतून विकासकामांना गती देण्यात आली. शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था, रेल्वे, मानव संसाधान विकास अशा क्षेत्रांतील भरीव कामगिरीमुळे भाजपला कौल.
3) पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान आसामला दिलेल्या सर्वाधिक भेटी, काँग्रेसच्या घराणेशाही राजकारणाविरोधात भाजपचे सक्षम व खंबीर नेतृत्व ही कारणेही विजयासाठी पूरक ठरली.
4) काँग्रेस आणि एयूडीएफकडून व्होट बँकेच्या राजकारणाद्वारे ध्रुवीकरणाचा प्रयत्न फसला. काँग्रेस आणि एयूडीएफचे राजकारण सर्वसमावेश नसल्याचा त्यांना फटका बसला.
5) काँग्रेसने सीएएचा मुद्दा प्रचारात ओढूनताणून आणला, पण आसामी जनतेने त्याला महत्त्व दिलेच नाही.
6) 2018-19 मध्ये सीएए-एनआरसीचे मुद्दे समोर आले होते. परंतु यानंतर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला भरभरून मतदान दिले, यामुळे या निवडणुकीतही हे मुद्दे गौण ठरले.
7) काँग्रेस-एयूडीएफ हे भूमिपुत्रांच्या मागे न उभे राहता घुसखोरांचे समर्थन करत राहिले, उलट भाजपने स्थानिकांना संरक्षण देऊन तीन लाखांहून जास्त स्थानिकांना जमिनीचे पट्टे दिले, रस्ते व पूल बांधले.
8) विकास, स्थैर्यासाठी भाजपला दुसऱ्यांदा बहुमत.
9) पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी, विकासात्मक धोरणाला जनतेने कौल दिला.
10) 2016 मध्ये भाजपने दिलेली भ्रष्टाचार, प्रदूषण, कट्टरतावाद यांच्या निर्मूलन, भारत बांग्लादेशच्या सीमा बंद करणे ही दिलेली आश्वासने जवळजवळ पूर्ण केली, यामुळे जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकला.
आसाममध्ये तीन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक पार पडली. येथे विधानसभेच्या एकूण 126 जागा आहेत. 30 ते 35 जागांवर मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. प्रामुख्याने लोअर आसाममध्ये मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत. आसामात भाजप, आसाम गण परिषद, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलसोबत आहे. दुसरीकडे, काँग्रेसची सहा पक्षांशी महाआघाडी होती. यात बदरुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफसोबतच बीपीएफ, सीपीआय, सीपीआय-एम आणि आंचलिक गण र्मोचाचा सहभाग आहे.
दुपारी 2 वाजता निवडणूक आयोगाचा अधिकृत कल/निकाल
2016चा निवडणूक निकाल
एनडीए – 86 उमेदवार
भाजप – 60, आसाम गण परिषद – 14, बोडोलँड पीपल्स फ्रंट -12,
यूपीए – 40 उमेदवार
काँग्रेस – 26, एआययूडीएफ – 13, अपक्ष-1.
Assam Assembly Elections 2021: 10 reasons for BJP’s second victory in Assam, read here
महत्त्वाच्या इतर बातम्या
- West bengal assembly elections 2021 results updates : बंगालमध्ये ममतांचा निवडणूकीपूर्वी मंदिर दर्शन, चंडीपाठ; तृणमूळ विजयानंतर हिरव्या गुलालाची उधळण!!
- Assam Assembly Elections Results : आसाममध्ये ना प्रियांकांची जादू चालली, ना बघेलांचा करिष्मा; पुन्हा एकदा भाजप सरकार
- 5 states election analysis : काँग्रेसचा मोठा political immunity lost, जी – २३ नेत्यांना जिंकणारा काँग्रेस कुळाचा नेता मिळाला
- Assembly Election Results Live : आसाम आणि केरळात सत्ताधाऱ्यांचे पुनरागमन जवळपास निश्चित, आसामात भाजप 80 जागांवर, तर केरळात एलडीएफ 91 जागांवर आघाडीवर
- Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates : अभिनेता कमल हासन याची दक्षिण कोयंबतूरमधून आघाडी