• Download App
    आसाम व मेघालयाचा सीमाप्रश्न सुटला; गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या । Assam and Meghalaya border issue resolved; The agreement was signed in the presence of Home Minister Amit Shah

    आसाम व मेघालयाचा सीमाप्रश्न सुटला; गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आसाम व मेघालयाचा गेल्या अनेक वर्षांपासून तेवत असलेला सीमाप्रश्न सुटला आहे. १२ पैकी सहा ठिकाणांबाबत असलेल्या सीमावादावर समेट घडवून आणणाऱ्या दस्तऐवजावर सामंजस्य करार झाला.गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रश्न मार्गी लागला आहे. Assam and Meghalaya border issue resolved; The agreement was signed in the presence of Home Minister Amit Shah



    महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाप्रमाणे हा वाद ५० वर्षांपासून सुरू होता. पूर्वोत्तरसाठी हा ऐतिहासिक दिन असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा व मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. करारामुळे आता उभय राज्यांतील ८८४.९ किमी सीमेसह १२ ठिकाणांपैकी सहा ठिकाणांवरील वाद संपुष्टात येईल. गृह मंत्रालयातील करारानंतर शहा म्हणाले, करारामुळे दोन्ही राज्यांत आता ७० टक्के सीमावादाची सोडवणूक झाली आहे.

    वादंगाला १९७२ मध्ये सुरुवात

    मेघालयाची स्थापना १९७२ मध्ये आसाममधून बाहेर पडून झाली होती. परंतु नव्या राज्यामुळे आसामच्या पुनर्स्थापना अधिनियम १९७१ ला आव्हान दिले होते. त्यातून सीमेवरील बारा भागांवर वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर दोन्ही राज्यातील नागरिकांना त्यातही सीमेवरील लोकांना हे त्रासाचे झाले होते.

    Assam and Meghalaya border issue resolved; The agreement was signed in the presence of Home Minister Amit Shah

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले