• Download App
    महात्मा गांधीजींना बाजूला सारून "ते" सावरकरांना राष्ट्रपिता म्हणूनही घोषित करतील; राजनाथ सिंहांवर असदुद्दीन ओवैसी संतापले। Aside from Mahatma Gandhi, "they" will also declare Savarkar as the Father of the Nation; Asaduddin Owaisi was angry with Rajnath Singh

    महात्मा गांधीजींना बाजूला सारून “ते” सावरकरांना राष्ट्रपिता म्हणूनही घोषित करतील; राजनाथ सिंहांवर असदुद्दीन ओवैसी संतापले

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला मजबूत राष्ट्रीय सुरक्षा नीती आणि परराष्ट्र नीती दिली, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून त्यावर क्रिया – प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. Aside from Mahatma Gandhi, “they” will also declare Savarkar as the Father of the Nation; Asaduddin Owaisi was angry with Rajnath Singh

    हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर संतप्त झाले असून “ते” सावरकरांना महात्मा गांधी यांना बाजूला सारून त्यांच्या जागी राष्ट्रपिता म्हणून देखील जाहीर करतील, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.



    स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या संशोधन ग्रंथाचे काल दिल्लीत प्रकाशन झाले, त्यावेळी राजनाथ सिंह यांनी सावरकरांचे देशाच्या संरक्षण क्षेत्रातील आणि परराष्ट्र क्षेत्रातील योगदान याविषयी गौरवोद्गार काढले. सावरकरांनी माफीनामा लिहिल्याचे खोटे सांगितले गेले. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो आहे. महात्मा गांधी यांनी देखील त्यांना प्रत्येक कैद्याला उपलब्ध असणारी दया याचिका करायला सांगितले होते, याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले. त्याच वेळी त्यांनी सावरकर हे फक्त व्यक्ती नसून ते विचार आणि विस्तार आहेत, या अटल बिहारी वाजपेयी यांच्या वक्तव्याचा ही उल्लेख केला.

    राजनाथ सिंह यांनी सावरकरांविषयी असे गौरवोद्गार काढल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येत ज्यांचा सहभाग होता, त्या सावरकरांना “हे लोक” राष्ट्रपिता म्हणून घोषित करतील आणि महात्मा गांधींना बाजूला सारतील. न्यायमूर्ती कपूर आयोगाने सावरकरांचा कसा सहभाग होता, याचे तपशीलवार वर्णन केले आहे असा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केला. राजनाथ सिंह आणि असदुद्दीन ओवैसी यांनी परस्पर विरोधी वक्तव्य केल्याने सावरकरांविषयीचा राजकीय वाद पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे.

    Aside from Mahatma Gandhi, “they” will also declare Savarkar as the Father of the Nation; Asaduddin Owaisi was angry with Rajnath Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम