- हरमनप्रीतने दोनदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले.
- भारत सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
वृत्तसंस्था
ढाका :टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघाने आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. बांगलादेशीतल ढाका शहरात सुरु असलेल्या आशियाई चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर ३-१ च्या फरकाने मात केली आहे. पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय नोंदवत भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.Asian Champions Trophy: Give it a go! India beat Pakistan 3-1; Beat in the semifinals; Top on India score board ..
विशेषकरुन रुपिंदरपाल सिंग, एस.व्ही. सुनील यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर भारताने युवा खेळाडूंच्या साथीने चांगली कामगिरी करत पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला.
पहिल्या सत्रात भारतीय खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. पाकिस्तानी गोलपोस्टवर आक्रमण केल्यानंतर भारताने पेनल्टी कॉर्नर कमावला. हरमनप्रीतने या संधीचं सोनं करत पहिला गोल झळकावत भारताला आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात पाकिस्तानी खेळाडूंनी तुलनेने चांगला बचावात्मक खेळ केला. भारताने दुसऱ्या सत्रातही सामन्यावर आपलं नियंत्रण ठेवलं होतं, परंतू पाकिस्तानचा बचाव भेदण्यात भारताला यश आलं नाही. त्यामुळे सामन्याच्या मध्यांतराला भारताकडे १-० अशी आघाडी कायम होती.
सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी चांगला खेळ करत प्रत्येकी एक गोल केला. आकाशदीपने भारतासाठी दुसरा गोल करत टीम इंडियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पाकिस्तानच्या जुनैद मंजूरने गोल करत भारताची आघाडी कमी केली. मात्र, नंतर हरमनप्रीतने या सामन्यात दुसरा गोल करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली, जी निर्णायक ठरली.
हरमनप्रीतने दुसरा गोल केला
या स्पर्धेत पाकिस्तानला पहिल्यांदा पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. नीलम संजीवच्या चुकीमुळे पाकिस्तानला ही संधी मिळाली, पण सूरज कारकेराने डाव्या पायाने चेंडू रोखून त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.
काही वेळातच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रीतने सामन्यातील दुसरा गोल करत टीम इंडियाची आघाडी मजबूत केली. या सामन्यातही पाकिस्तानला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण इथेही गोल करता आला नाही.
गेल्या वेळी हे दोन्ही संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी टप्प्यात आमनेसामने आले होते आणि तेव्हाही भारताने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. भारतीय संघाने आतापर्यंत पाकिस्तान, कोरिया आणि बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांत 14 गोल केले आहेत. भारत सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
Asian Champions Trophy: Give it a go! India beat Pakistan 3-1; Beat in the semifinals; Top on India score board ..
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीची नजर; लोकलच्या प्रवासात गुन्हेगारीला आळा
- शिवसेना आमदारांची तक्रार खरीच; आमदार निधी वाटपात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी चौपट!!; काँग्रेसचीही सेनेवर आघाडी
- बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!; भारताने पुन्हा दिले बांधून!!
- पिंपरी : मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड ; राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना घडला प्रकार