• Download App
    काबूलमधून एक पैसाही बरोबर नेलेला नाही, केवळ सुरक्षेसाठीच देश सोडला, अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांचा दावा। Ashrf Ghani stayed in UAE

    काबूलमधून एक पैसाही बरोबर नेलेला नाही, केवळ सुरक्षेसाठीच देश सोडला, अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांचा दावा

    वृत्तसंस्था

    दुबई : देशाचा कोट्यवधी पैसा घेऊन पळाल्याच्या ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या राजदूताने केलेला आरोप अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांनी साफ फेटाळून लावला आहे, ते म्हणाले एकच पारंपरिक कपडे व कोट घेऊन काबूलमधून निघालो. पायातील सँडल काढून बूट घालण्यासही मला वेळ मिळाला नाही. मी पैसे घेऊन पळाल्याचा आरोप पूर्णपणे आधारहिन आहे. Ashrf Ghani stayed in UAE

    ‘मी देशातून पैसा घेऊन आलेलो नाही. शांतीपूर्वक वातातावरणात सत्ता सोपविण्याशच्याऊ माझा विचार होता. मी माझ्या देशाला रक्तरंजित युद्धापासून वाचविले आहे, असा दावा घनी यांनी केला.



    सुरक्षेच्या कारणावरून मी अफगाणिस्तानापासून दूर आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांशी सल्ल्यानंतरच मी हे पाऊल उचलले, असेही ते म्हणाले. तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलवर ताबा मिळविण्यापूर्वीच घनी यांनी देशातून पलायन केले. त्यानंतर ते रात्री प्रथमच जगासमोर आले आणि काबूलमधून पळून गेल्याच्या कृतीचे त्यांनी समर्थन केले. देशात रक्तपात रोखण्यासाठी तोच एक मार्ग असल्याचा दावा त्यांनी केला.

    घनी यांनी सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आश्रय घेतला आहे. ‘‘मी देशातून बाहेर पडलो नसतो तर मोठा रक्तपात व हिंसाचार झाला असता. मी देशाला अशा स्थितीत पाहू शकलो नसतो. यामुळेच मी तेथून पळून गेलो, असे त्यांनी स्पष्ट केले.

    Ashrf Ghani stayed in UAE

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी