वृत्तसंस्था
जयपूर : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना अपमानित होऊन सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्यानंतर अनेक राजकीय क्रिया-प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी एक सविस्तर ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग हे काँग्रेसचे सच्चे सैनिक आहेत. ते काँग्रेसचे नुकसान होईल असे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत, अशी अपेक्षा गेहलोत यांनी व्यक्त केली आहे.
पण अशोक गेहलोत यांचे हे ट्विट कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या दुःखावर घातलेली फुंकर आहे की जखमेवर चोरलेले मीठ आहे… याविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. Ashok Gehlot’s blow on Captain Saheb’s grief or salt on his wound … ??
अशोक गेहलोत यांनी या ट्विटमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीविषयी गौरवोद्गार काढले हे खरे, पण मुख्यमंत्री बदलताना काँग्रेस श्रेष्ठींना कशा समस्यांना सामोरे जावे लागते याचे वर्णन केले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असणार्या अनेकांची नाराजी ओढवून काँग्रेस श्रेष्ठी एका नेत्याला मुख्यमंत्री नेमतात. त्यावेळी त्या नेत्याला बरे वाटते. परंतु तोच नेता मुख्यमंत्री बदलाच्या वेळी काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयावर नाराज होऊन त्यांना चुकीचा ठरवू लागतो. अशा वेळी आपण आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला पाहिजे, असा उपदेश अशोक गहलोत यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांना केला आहे.
ट्विट मधला हाच उल्लेख कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या दुःखावर फुंकर आहे की जखमेवर चोरलेले मीठ आहे… याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. वास्तविक पाहता अशोक गहलोत हे स्वतः राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावरून अडचणीत आहेत. त्यांच्या विरोधात सचिन पायलट नाराज आहेतच पण त्यांचे ओएसडी यांनी लोकेश शर्मा यांनी राजीनामा देऊन त्यांना अडचणीत आणले आहे. राजस्थानातील अन्य प्रश्न सोडविण्याऐवजी आणि आपल्या समोरच्या राजकीय पेच प्रसंगांना सामोरे जाण्याऐवजी अशोक गेहलोत हे कॅप्टन अमरिंदरसिंग यांना उपदेश करत आहेत, अशी टीकाही अशोक गेहलोतांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळातून होत आहे.
Ashok Gehlot’s blow on Captain Saheb’s grief or salt on his wound … ??
महत्त्वाच्या बातम्या
- डोंबिवलीत पाण्यापाई तरुणीचा हात मोडला कल्याण-डोंबिवलीत २७ गावे तहानलेली
- दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप