• Download App
    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी नको तर लस पुरवावी, गेहलोत यांची टीका।Ashok Gehlot targets Modi Govt.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी नको तर लस पुरवावी, गेहलोत यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाची आकडेवारी अधोरेखित करण्याऐवजी लस पुरवावी असे उपरोधिक आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले. Ashok Gehlot targets Modi Govt.

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने त्यांनी सांगितले की, या लाटेचा फटका लहान मुलांना बसला तर देश त्यांना कधीही माफ करणार नाही. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात लस लवकर मिळाली नाही तर तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होऊ लागेल. तशा स्थितीत ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याची स्थिती दुसऱ्या लाटेपेक्षा आणखी गंभीर होईल. लहान मुलांचा जीव वाचविणे अवघड बनेल.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लस उत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे होते. आवश्यकता भासल्यास आणखी कंपन्यांना उप्तादनाची परवानगी द्यायला हवी होती आणि कायदा बदलून लसनिर्मितीला प्रोत्साहन द्यायला हवे होते. आकडेवारी बाजूला ठेवून राज्यांसाठी जास्त लशी उपलब्ध केल्या जाव्यात.

    Ashok Gehlot targets Modi Govt.

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य