• Download App
    'हे सर्व मुस्लिमांचे मते घेतात अन् मुलांना तुरुंगात सडवतात!', यूपीत ओवैसींनी सपा, बसपा अन् काँग्रेसला धू-धू धुतले! । Asaduddin Owaisi Targets SP, BSP And Congress In Uttar Pradesh

    ‘हे सर्व मुस्लिमांचे मते घेतात अन् मुलांना तुरुंगात सडवतात!’, यूपीत ओवैसींनी सपा, बसपा अन् काँग्रेसला धू-धू धुतले!

    Asaduddin Owaisi : एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, मुस्लिमांनी आता जागरूक राहिले पाहिजे आणि कोणाचेही अनुसरण करण्याऐवजी स्वत:ला नेता म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओवैसी यूपीच्या दौऱ्यावर असून गुरुवारी ते बाराबंकीच्या कटरा परिसरात एका जाहीर सभेला संबोधित करत होते. Asaduddin Owaisi Targets SP, BSP And Congress In Uttar Pradesh


    वृत्तसंस्था

    लखनऊ : एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, मुस्लिमांनी आता जागरूक राहिले पाहिजे आणि कोणाचेही अनुसरण करण्याऐवजी स्वत:ला नेता म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओवैसी यूपीच्या दौऱ्यावर असून गुरुवारी ते बाराबंकीच्या कटरा परिसरात एका जाहीर सभेला संबोधित करत होते.

    सपा, बसपा व काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, या पक्षांनी मुस्लिमांच्या हक्कांसाठी कधीही आवाज उठवला नाही. या लोकांनी मुस्लिमांची मते घेतली आहेत, पण त्यांची कधी पर्वा केली नाही. या पक्षांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि तिहेरी तलाकला विरोध केला नाही.

    ओवैसी म्हणाले की, स्वातंत्र्यापासून आपला समाज केवळ मतांसाठी वापरला जात आहे. सपा, बसपा, काँग्रेस या सर्वांनी आमचा वापर केला आहे. ज्या जातीचे प्रतिनिधी नसेल त्यांचे कोणत्याही सरकारमध्ये ऐकले जाणार नाही. ते म्हणाले की, तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडा आणि मजलिसमध्ये तुमची ताकद वाढवा. तुमचा आवाज बनून आम्ही संसदेपासून कायद्यापर्यंतच्या अधिकारासाठी लढा देऊ.

    ते म्हणाले की, मतांच्या आधारावर तुमच्या लोकांना जमिनीवर आणि खुर्चीवर बसवण्याचे धाडस करा. जर तुम्ही बलवान झालात तर लोक तुमच्या पायाशी भीक मागतील. ओवैसी म्हणाले की, सर्व पक्ष आमच्या समाजाची मते घेऊन सरकार बनवतात आणि आमच्या समाजाच्या मुलांना तुरुंगात टाकून सडवतात.

    ओवैसींचे मिशन 2022

    ओवैसी म्हणाले की, आम्ही केवळ 2022च्या यूपी विधानसभा निवडणुकीची तयारी करत नाही. आम्ही राज्यात एक मजबूत पक्ष म्हणून उदयास येऊ. म्हणाले की, 2014 पासून मुस्लिमांना मॉब लिंचिंगच्या नावाखाली मारले जात आहे.

    गुरुवारी शहरातील कटरा परिसरात ते आले होते. बैठकीसह इतर कार्यक्रम रद्द केल्यानंतर प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी उशिरा त्यांना परवानगी दिली होती.

    Asaduddin Owaisi Targets SP, BSP And Congress In Uttar Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती