• Download App
    उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता येण्याचे सर्वै येताच मायावती म्हणाल्या, दलित, आदिवासी, पिछडे, मुस्लीम आणि ब्राह्मणही बसपच्या पाठीशी As the UP Assembly elections will get closer, anti-BSP forces' conspiracy will get lowly, vitriolic and full of mischievous news.

    उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता येण्याचे सर्वै येताच मायावती म्हणाल्या, दलित, आदिवासी, पिछडे, मुस्लीम आणि ब्राह्मणही बसपच्या पाठीशी

    वृत्तसंस्था

    लखनौ – उत्तर प्रदेशात भाजपला 259 ते 267 जागा मिळतील. समाजवादी पक्षाला 109 ते 117, बसपाला 12 ते 16, तर काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजप सत्ता राखेल परंतु त्यांच्या जागा कमी होतील. मात्र, समाजवादी पक्षाच्या जागा वाढणार आहेत, असा सर्वै प्रसिध्द होताच बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या खवळल्या आहेत. As the UP Assembly elections will get closer, anti-BSP forces’ conspiracy will get lowly, vitriolic and full of mischievous news.

     

    त्यांनी राज्यातले दलित, आदिवासी, पिछडे, मुस्लीम आणि उच्चवर्णीय ब्राह्मण देखील मजबूतीने बहुजन समाज पक्षाच्या पाठीशी उभे राहिल्याचा दावा केला आहे. प्रत्येक निवडणूकीपूर्वी बहुजन समाज पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो, कट कारस्थाने होतात, तसेच यावेळी देखील चालले आहे. त्यातूनच भाजपला उत्तर प्रदेशात बहुमत मिळणार असल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहेत, असा दावा मायावती यांनी केला आहे.

    उत्तर प्रदेशातील 45 टक्के लोक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कामाकाजावर समाधानी आहेत. 34 टक्के लोक असमाधानी आहेत. विरोधी पक्षांनी आपली भूमिका योग्यरित्या निभावली का? असा सवालही मतदारांना विचारण्यात आला होता. त्यावेळी 40 टक्के लोकांनी विरोधी पक्षाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. 34 टक्के लोक विरोधकांवर नाराज आहेत. असे एबीपी – सी वोटर यांनी केलेल्या सर्वैत दाखविण्यात आले आहे. त्यावर मायावती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.



    मायावती म्हणाल्या, की बहुजन समाज पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजप, समाजवादी पार्टी, काँग्रेस हे सगळे पक्ष एकत्र येतात. त्यांना खरी टक्कर बहुजन समाज पक्षच देऊ शकतो, याची जाणीव आहे. त्यामुळेच ते बसपची प्रत्येक निवडणूकीपूर्वी विविध मार्गांनी बदनामी करतात. कट कारस्थाने करतात. पण उत्तर प्रदेशातील दलित, आदिवासी, पिछडे, मुस्लीम आणि उच्चवर्णीय ब्राह्मण देखील ठामपणे बहुजन समाज पक्षाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांना भाजपची सत्ता राज्यात नको आहे, असा दावा देखील मायावती यांनी केला आहे.

    As the UP Assembly elections will get closer, anti-BSP forces’ conspiracy will get lowly, vitriolic and full of mischievous news.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!