• Download App
    सोनिया, राहुल यांचा भारतीय लसीवर विश्वास नाही; केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांचे वादग्रस्त विधान As per my knowledge, Sonia & Rahul Gandhi haven't taken vaccine. They don't have confidence in Indian vaccine

    सोनिया, राहुल यांचा भारतीय लसीवर विश्वास नाही; केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांचे वादग्रस्त विधान

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना प्रतिबंधक मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर त्यावर विविध नेत्यांच्या क्रिया – प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातच केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक विधान करून वादामध्ये भर घातली आहे. As per my knowledge, Sonia & Rahul Gandhi haven’t taken vaccine. They don’t have confidence in Indian vaccine

    प्रल्हाद जोशी म्हणालेत, की केंद्र सरकारने जानेवारी २०२१ मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरूवात केली. त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी शंका – कुशंका व्यक्त केल्या. लसीच्या परिणामकारकतेबद्दल शंका व्यक्त केल्या. त्यामुळे समाजात गैरसमज पसरले. आता तेच काँग्रेस नेते लस टोचून घेण्यासाठी पुढे येत आहेत. पण माझ्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अद्याप लस टोचून घेतलेली नाही. या दोन्ही नेत्यांचा बहुतेक भारतीय लसींवर विश्वास दिसत नाही.

    प्रल्हाद जोशी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधीवर असा थेट हल्ला चढविल्याने भाजप – काँग्रेस यांच्यात मोठा वाद उफाळण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, संसदेचे पावसाळी अधिवेशन नियोजित कार्यक्रमानुसार जुलैमध्ये सुरू होईल. तोपर्यंत संसदेचा स्टाफ आणि सर्व खासदारांचे लसीकरण झालेले असेल. त्यामुळे नेहमीच्या पध्दतीने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बैठका नियमित स्वरूपात होण्याची शक्यता आहे. सरकारच्या बाजूने पूर्ण अधिवेशन घेण्याची तयारी सुरू आहे.

     

    As per my knowledge, Sonia & Rahul Gandhi haven’t taken vaccine. They don’t have confidence in Indian vaccine

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!