भारतात करोना लसीची कमतरता जाणवत असताना ११ एप्रिलपर्यंत देशात वापरासाठी उपलब्ध झालेल्या एकूण लसीपैंकी २३ टक्के लसीचा अपव्यय झाला आहे. तब्बल ४४ लाख कोरोना प्रतिबंधक लसी वाया गेल्या आहे. As many as 44 lakh corona vaccines were wasted, Rajasthan wasted the highest dose
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात करोना लसीची कमतरता जाणवत असताना ११ एप्रिलपर्यंत देशात वापरासाठी उपलब्ध झालेल्या एकूण लसीपैंकी २३ टक्के लसीचा अपव्यय झाला आहे. तब्बल ४४ लाख कोरोना प्रतिबंधक लसी वाया गेल्या आहे.
माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती उघड झाली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांत ११ एप्रिलपर्यंत जवळपास १०.४ कोटी डोसपैंकी एकूण ४४.७८ लाखहून अधिक लसीचे डोस वाया गेले. राजस्थानात सर्वाधिक म्हणजेच ६,१०,५५१ डोस वाया गेले.गोवा, पश्चिम बंगाल, लक्षद्वीप, केरळ, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच मिझोराम यांनी एकही लस वाया जाऊ दिली नाही.
लसीच्या एका कुपीत (बाटलीत) १० डोस असतात. कुपी उघडल्यानंतर पुढच्या चार तासांत ही लस वापरात येणं गरजेचं असतं. त्यामुळे दिवसात आपल्याला किती कुपी उघडायच्या आहेत, हे वापरकर्त्यांना माहीत असायला हवं.
दिवसाच्या शेवटी कुपी उघडली गेली तर केवळ एक किंवा दोन लाभार्थी असतील आणि त्यांना लस दिली गेली तर उर्वरित आठ डोस वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उघडलेल्या कुपींची संख्या आणि लसीकरणासाठी आलेल्या व्यक्ती यांचं संतुलन ठेवणं गरजेचं आहे. लसीकरणासाठी एक व्यक्तीही लसीकरण केंद्रात दाखल झाली आली तरी जोखीम घेऊन कुपी उघडावी लागते. त्यामुळे, उरलेली लसीच्या डोसचा अपव्ययात समावेश होतो.
राजस्थानात सर्वाधिक ६,१०,५५१ डोस वाया गेले आहे. यापाठोपाठ तामिळनाडू ( ५,०४,७२४), उत्तर प्रदेश ( ४,९९,११५), महाराष्ट्र ( ३,५६,७२५), गुजरात ( ३.५६ लाख), बिहार ( ३,३७,७६९), हरियाणा (२,४६,४६२), कर्नाटक (१४,८४२), तेलंगणा ( १,६८,३०२), पंजाब ( १,५६,४२३), छत्तीसगड (१.४५ लाख), ओडिशा ( १,४१,८११), आंध्र प्रदेश ( १,१७,७३३), आसाम (१,२३,८१८), दिल्ली (१.३५ लाख) या राज्यांनी लाखांच्या संख्येने डोस वाया घालविले आहेत.