• Download App
    आझादी का अमृत महोत्सव! इंडियन नेव्हीच्या ऑफिसर्स आणि सेलर्सचा नवा उपक्रम, सर केले महाराष्ट्रातील आणि गोव्यातील 75 किल्ले | As a part of 'Azadi ka amrit Mahotsav' , Indian Navy teams trek 75 forts in Maharashtra and Goa

    आझादी का अमृत महोत्सव! इंडियन नेव्हीच्या ऑफिसर्स आणि सेलर्सचा नवा उपक्रम, सर केले महाराष्ट्रातील आणि गोव्यातील 75 किल्ले

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : इंडियन नॅशनल स्कूल, लोणावळा मधील इंडियन नेव्ही ऑफिसर्स आणि सेलर्स यांच्या 75 जणांच्या टीमने महाराष्ट्रातील आणि गोव्यातील एकूण 75 किल्ले सर करण्याचा निर्धार केला होता. नरेंद्र मोदी यांनी  सुरू केलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ याअंतर्गत ही अक्टिव्हिटी राबवण्यात आली हाेती. महात्मा गांधींच्या 152 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम सुरू केला आहे.

    As a part of ‘Azadi ka amrit Mahotsav’ , Indian Navy teams trek 75 forts in Maharashtra and Goa

    दक्षिण नौदल कमांड, नौदलाचे प्रशिक्षण कमांड यांच्या नुसार इंडियन नॅशनल स्कुल लोणावळा येथे ‘अमृत गौरव’ हा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला होता. या इनिशिएटिव्ह अंतर्गत 75 लोकांच्या टीमला दोन विभागामध्ये आणि सात उपविभागामध्ये विभागण्यात आले होते. इंडियन नॅशनल स्कुल लोणावळा पासून 75 किल्ल्यांचे एकूण अंतर किती आहे यावर आधारित ह्या टीम बनवल्या गेल्या होत्या.


    Indian Navy Recruitment 2021 : बेरोजगार तरुणांना भारतीय नौदलात अधिकारी पदाची सुवर्णसंधी, अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा तपशील


    शनिवारी गांधी जयंतीनिमित्त या इव्हेंटचा समारोप करण्यात आला आहे. या अक्टिव्हिटीसाठी एकूण 1200 तास लागले होते. सुरुवाती पासून ते समारोपा पर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे तास मोजण्यात आले होते.

    महात्मा गांधींनी अहिंसेचा संदेश देऊन इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी भारतीयांना बळ दिले होते. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आग्रह धरून स्वतंत्र स्वराज्य निर्माण केले होते. याचीच आठवण म्हणून आणि मिळालेल्या सांस्कृतिक वारशाचा आदर म्हणून हे इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आले होते. त्याचबरोबर वैयक्तिक फिटनेसचे महत्त्व लोकांमध्ये जागृत व्हावे हा देखील एक मूळ उद्देश होता असे संबधीत अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले आहे.

    As a part of ‘Azadi ka amrit Mahotsav’ , Indian Navy teams trek 75 forts in Maharashtra and Goa

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!