• Download App
    आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 30 ऑक्टोबरपर्यंत कोठडीतच मुक्काम | Aryan Khan remanded in judicial custody till October 30

    आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 30 ऑक्टोबरपर्यंत कोठडीतच मुक्काम

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने फेटाळून लावले होते.
    त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत या तिघांनीही जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. तोवर एनसीबीच्या विशेष न्यायालयातील सुनावणीमध्ये या तिघांच्याही न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. या सुनावणीदरम्यान आर्यन खान व इतर आरोपींना प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले नव्हते.

    Aryan Khan remanded in judicial custody till October 30

    याआधी 7 तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. ही न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपली होती. त्यानंतर ही सुनावणी करण्यात आली आहे. या वेळी आर्यन खान आणि इतर आरोपींची पुन्हा 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


    Aryan Khan Drugs Case : 26 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार आर्यन, मन्नतवर एनसीबीच्या नोटीसमध्ये काय होते? वाचा सविस्तर…


    आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका नाकारून मंगळावर अर्थात 26 ऑक्टोबर ही तारीख सुनावणीसाठी दिल्यामुळे त्याचा आधीच तुरुंगामधील मुक्काम वाढला होता. त्यामध्येच एनसीबी न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आर्यनच्या एकूण अडचणीत वाढ झालेली आहे असे दिसते आहे.

    Aryan Khan remanded in judicial custody till October 30

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    द फोकस एक्सप्लेनर : काश्मीर प्रश्नावर भारताची रोखठोक भूमिका; पाकिस्तानने PoK रिकामा करावा, तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नको

    PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!