२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना समन्स पाठवले आहे. याप्रकरणी आज (१८ मे) वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सीबीआयने सांगितले. Aryan Khan bribery case CBI summons former NCB officer Sameer Wankhede tomorrow
आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सीबीआयने नुकतेच समीर वानखेडेंच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. यादरम्यान, सीबीआयने सांगितले की, ड्रग्ज प्रकरणात न अडकण्याबद्दल अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वानखेडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय? –
२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. ड्रग्जप्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह २० जणांना अटक केली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती.
त्यातच आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची लाच मागितली होती. त्यातील 8 कोटी वानखेडे यांना देणार होतो, असे साईल यांनी सांगितलं होतं. त्याची गंभीर दखल घेत एनसीबीच्या दक्षता विभागामार्फत समीर वानखेडे यांची चौकशी केली होती. त्याचप्रकरणात सीबीआयने हे छापे कल्याचे सांगण्यात येत आहे.
Aryan Khan bribery case CBI summons former NCB officer Sameer Wankhede tomorrow
महत्वाच्या बातम्या
- West Bengal : पूर्व मिदनापूरच्या इगरामध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट सहा जणांचा मृत्यू
- सिद्धरामय्या की शिवकुमार??; गांधी परिवारात आई विरुद्ध मुलगा; मल्लिकार्जुन खर्गे पेचात!!
- अमेरिकन शिष्टमंडळाने राजदूत एरिक गारसेट्टींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट
- आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता 25000 रुपये; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय