वृत्तसंस्था
पणजी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या गोवा दौऱ्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गोव्यात आले आहेत. गोव्यात दाखल होताच त्यांनी फक्त मुस्लिमांचे लांगूलचालन केले असे नव्हे, तर “सर्वधर्मसमभाव” लांगूलचालन करून ते मोकळे झाले आहेत.Arvind Kejriwal’s “Sarvadharmasambhav” tailgating in Goa !! How and when ??
अरविंद केजरीवाल यांनी एकापाठोपाठ एक सर्व धर्मियांसाठी मोफत तीर्थयात्रांची घोषणा केली आहे. गोव्यात आम आदमी पार्टी सत्तेवर आली तर गोवेकरांना मोफत तीर्थयात्रेचा लाभ देण्यात येईल.
हिंदूंना अयोध्येची मोफत तीर्थयात्रा घडवणार, ख्रिश्चनांना वेळासंगवसची मोफत तीर्थयात्रा घडवणार, मुस्लिमांना अजमेर शरीफची मोफत तीर्थयात्रा घडवणार आणि सर्वधर्मीय साई भक्तांना शिर्डीची मोफत तीर्थयात्रा घडवणार, अशा घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केल्या आहेत.
आत्तापर्यंत अरविंद केजरीवाल दिल्लीच्या विकासाच्या बाता सर्व निवडणुकांमध्ये करून आम आदमी पार्टीसाठी मते मागत होते. पण काहीच दिवसांपूर्वी त्यांनी अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले आणि शरयूच्या आरतीत सहभागी झाले. त्यानंतर त्यांचे मतपरिवर्तन झाले की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आहे.
कारण गोव्यात दाखल होताच त्यांनी वर उल्लेख केलेल्या सर्वधर्मियांसाठी मोफत तीर्थयात्रांची घोषणा करून टाकली आहे. एक प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी आपला राजकीय अजेंडा हा विकासाच्या मुद्द्यांवरून वळवून धर्माच्या मुद्द्यांवर आणला आहे की काय?, याची शंका निर्माण झाली आहे.
Arvind Kejriwal’s “Sarvadharmasambhav” tailgating in Goa !! How and when ??
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचा पुन्हा एकदा पंजाब सरकारवर निशाणा, म्हणाले- अखेरच्या दोन महिन्यांत जनतेला लॉलीपॉप देताहेत!
- धक्कादायक! बुरखा न घालता जीन्स घातली म्हणून मुलीसोबत गैरवर्तन
- CHITRA WAGH VS THAKREY : ‘तुमच्या वडिलांनी ही वेळ आणली’ म्हणत चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरेंना पत्र अन् …ते चार प्रश्न ?
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक रिंगणातून अखिलेश यादव बाहेर; पराभवाची भीती की “यशस्वी माघार”?
- T20 WORLD CUP : WE were not brave enough… ; विराट कोहलीच्या वक्तव्यावर कपिल देव म्हणाले ‘शोभत नाही…’