• Download App
    मोदी पायउतार झाल्यावर भाजपचे भ्रष्ट नेते तुरुंगात, केजरीवालांची दिल्ली विधानसभेत आगपाखड; पण नेमके "रहस्य" काय?? Arvind kejriwal fired solvo at BJP and Narendra modi, but he himself is under central agencies Scanners

    iCloud : मोदी पायउतार झाल्यावर भाजपचे भ्रष्ट नेते तुरुंगात, केजरीवालांची दिल्ली विधानसभेत आगपाखड; पण नेमके “रहस्य” काय??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजप नेत्यांवर प्रचंड आगपाखड केली. त्यांच्या तडाख्यातून ईडी, सीबीआय यांच्यासारख्या केंद्रीय तपास संस्था देखील सुटल्या नाहीत. Arvind kejriwal fired solvo at BJP and Narendra modi, but he himself is under central agencies Scanners

    ईडी, सीबीआय या तपास संस्थांचे अधिकारी वेगवेगळ्या पक्षातल्या भ्रष्ट नेत्यांच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून त्यांना विचारतात, तुम्हाला भाजपमध्ये जायचंय की तुरुंगात?? त्यामुळे काही नेत्यांनी भाजपचा मार्ग पत्करला आणि ते वाचले, असा अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत दावा केला. यावेळी त्यांनी नारायण राणे, हेमंत विश्वशर्मा यांची नावे घेतली.

    केजरीवाल यांचे हे भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. त्याच भाषणात केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील आगपाखड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही कायमचे त्या पदावर राहणार नाहीत. काळ सारखा बदलत असतो. ते कधी ना कधीतरी पायउतार होतीलच. पण त्यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या मदतीने बाकीच्या पक्षांमध्ये सगळे भ्रष्ट नेते भाजपमध्ये घेऊन ठेवले आहेत. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी भ्रष्टाचार केलाच नाही.

    त्यामुळे त्यांना मोदी “पटवू” शकले नाहीत. पण बाकीच्या भ्रष्टाचारी नेत्यांना त्यांनी भाजपमध्ये घेतले आहे. भाजपचे सरकार केंद्रातून गेल्यावर मोदी पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांना पकडणे फारच सोपे आहे. त्यांची रवानगी लगेच तुरुंगात करण्यात येईल, असे वक्तव्य केजरीवाल यांनी केले. या वक्तव्याला सोशल मीडियात भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे.



     डिजिटल पुरावे पुन्हा मिळाले

    पण केजरीवालांनी भाजप आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्यावर एवढी आगपाखड का केली आहे?? याचे नेमके “रहस्य” काय आहे??, याचा थोडा शोध घेतल्यावर वेगळीच माहिती समोर येत आहे. आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे आधीच तुरुंगात आहेत. दिल्लीच्या दारू धोरणासंदर्भात जे महत्त्वाचे डिजिटल पुरावे त्यांच्यासह अनेक आरोपींनी डिलीट केले होते, ते सगळे डिजिटल पुरावे केंद्रीय तपास संस्थांनी आता iCloud टेक्नॉलॉजी द्वारे रिकव्हर केले आहेत.

    या पुराव्यांच्या आधारे आम आदमी पार्टीचे अनेक बडे मासे कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहेत. खुद्द अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार आहे. लवकरच या संदर्भात काही “रिझल्ट” मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्यातूनच केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत आगपाखड केल्याचे दिल्लीतल्या राजकीय वर्तुळातल्या निरीक्षकांचे मत आहे.

    Arvind kejriwal fired solvo at BJP and Narendra modi, but he himself is under central agencies Scanners

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!