• Download App
    सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याआधीच अरविंद केजरीवालांनी उडविली आरोपांची राळ|Arvind Kejriwal blew up the allegations before facing the CBI investigation

    सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याआधीच अरविंद केजरीवालांनी उडविली आरोपांची राळ

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयकडून केजरीवाल यांना समन्स बजावण्यात आले आहे. याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत. त्यानंतर आता केजरीवाल यांना सीबीआयकडून समन्स आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. पण सीबीआय चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी केजरीवालांनी आरोपांची राळ उडविली आहे.Arvind Kejriwal blew up the allegations before facing the CBI investigation

    सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवार १६ एप्रिल रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व घडामोडींवर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीबीआयच्या कार्यप्रणालीवर आणि मोदी सरकारवर टीका करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.



    केजरीवाल यांची मोदी सरकारवर टीका 

    सीबीआयने आमच्यावर १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांच्याकडून अनेकदा संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यांनतर सीबीआय आणि ईडीकडून न्यायालयात खोटी प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आली आहेत. आमच्या विरोधात बोलण्यासाठी तपास यंत्रणांकडून अनेकांवर दबाव आणला जातो आहे, अशा भाषेत त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर टीका केली आहे.

    सीबीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह 

    काही दिवसांपूर्वी मनीष सिसोदिया यांनी स्वत:चे १४ फोन नष्ट केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. तर दुसरीकडे त्या १४ फोनपैकी ४ फोन सध्या सिसोदियांकडे असल्याचा दावा देखील ईडीकडूनच करण्यात आला आहे. याचाच अर्थ तपास यंत्रणा खोट्या पद्धतीने काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या दिवशी मी दिल्ली विधानसभेत भाजपाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध बोललो, तेव्हाच माझ्यावर कारवाई होईल, याची मला कल्पना होती. मात्र तरीदेखील मी सीबीआयला त्यांच्या चौकशी दरम्यान संपूर्ण सहकार्य करेन, असेही केजरीवाल म्हणाले.

    Arvind Kejriwal blew up the allegations before facing the CBI investigation

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!