विशेष प्रतिनिधी
इटानगर : लसीकरण मोहिमेत नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे आणि गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासकीय पातळीवरून अनेक योजना राबवल्या जात आहेत.Arunachal Pradesh vaccinator responds to vaccination with 20 kg of free rice
अरुणाचल प्रदेशमध्ये मोफत तांदूळ योजना परत आणऱ्यात आली असून लस घेणाऱ्या लोकांना स्थानिक प्रशासनाकडून मोफत २० किलो तांदूळ देण्यात आले. मोफत तांदळापोटी नागरिकांनी अनेक किलोमीटर अंतर पायी जाऊन लस घेत आहेत.
ईशान्य भारतात लसीकरणावरून बऱ्याच अफवा पसरल्या आहेत. लस टोचल्यानंतर गंभीर आजार, ॲलर्जी होत असल्याच्या अफवा पसरल्यामुळे नागरिकांकडून लस घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, लसीकरण मोहिमेचे अधिकारी दिमोंग पाडुंग यांनी राज्यात ३,९५,४४५ जणांचे लसीकरण झाल्याचे सांगितले.
लसीकरण वाढवण्यासाठी स्थानिक याझली मडळाने वीस किलो तांदूळ देण्याची घोषणा केली आणि तीन दिवस राबवण्यात आली. राज्यात शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. ४५ पेक्षा वयोगटावरील घरपोच लस घेणाऱ्या व्यक्तीला वीस किलोऐवजी दहा किलो तांदूळ मिळणार आहे.
Arunachal Pradesh vaccinator responds to vaccination with 20 kg of free rice
महत्त्वाच्या बातम्या
- Covid Alarm : ब्रिटिश शास्त्रज्ञांनी बनवला कोविड अलार्म, आता तपासणीशिवाय 15 मिनिटांत होईल कोरोनाग्रस्तांची ओळख
- बसपाचे बंडखोर आमदार अखिलेश यादवांना भेटले, पक्ष प्रवेशाच्या चर्चांना उधाण, मायावतींना मोठा धक्का
- Antilia Case : मनसुख हिरेन हत्येप्रकरणी NIA कडून दोन जणांना अटक, 21 जूनपर्यंत कोठडी
- मुजोर चीनला आर्थिक आघाडीवर उत्तर, 43 टक्के भारतीयांकडून वर्षभरात एकाही चिनी वस्तूची खरेदी नाही
- कोरोना लसीमुळे देशात पहिला मृत्यू झाल्याचा सरकारी समितीचा खुलासा, लस घेतल्यावर कोणती लक्षणे गांभीर्याने घ्यावी, वाचा सविस्तर…