विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत समन्वयाची जबाबदारी सहसरकार्यवाह अरुण कुमार यांच्याकडे सोपविली आहे.संघाच्या चित्रकुट येथील बैठकीत अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या संघटनात्मक जबाबदाºया निश्चित करून विविध कार्यांचा आढावा घेण्यात आला.Arun Kumar from Rashtriya Swayamsevak Sangh has the responsibility of coordinating with BJP
पुढच्यावर्षी प्रारंभी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यानंतर दोन वर्षांनी संघाच्या शताब्दी वर्षास प्रारंभ व लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने संघाने काही जबाबदारींमध्ये बदल केले. भाजपसोबत समन्वयाची जबाबदारी डॉ. गोपालकृष्णन यांच्याकडे होती.
२०१४पासून ते ही जबाबदारी सांभाळत होते. आता ते विद्याभारतीचे काम बघतील. त्यांच्या जागेवर अरुणकुमार आले आहेत. राजकीय विषयदेखील तेच बघतील. यापूर्वी त्यांच्याकडे अखिल भारतीय प्रचारप्रमुखपद होते. जम्मू-काश्मीरमध्येही त्यांनी काम केले. कृष्ण गोपाल यांना प्रकृतीच्या कारणाखाली बदलण्यात आल्याचे बोलले जाते.
संघाकडून भय्याजी जोशी यांच्याकडील विश्व हिंदू परिषदेचे काम कायम ठेवण्यात आले. राममंदिर ट्रस्टमधील चंपतराय यांच्या भूमिकेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. संघाने पश्चिम बंगालमधील प्रांत, क्षेत्र प्रचारक व क्षेत्रीय प्रभारी मोठ्या प्रमाणात बदलले.
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा लक्षात घेऊन संघही सज्ज झाला आहे. त्यासाठी देशपातळीवर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाणार आहेत. करोनापासून बचाव व उपचार यावर कार्यकर्ते देशाच्या कानाकोपऱ्यात सेवा देतील. एक महिन्याचे प्रशिक्षण राहील. सप्टेंबरमध्ये जनजागरण अभियानास प्रारंभ होईल.
महामारीपासून मुले आणि महिलांचे रक्षण करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशभरात सुमारे अडीच लाख स्थळांवर कार्यकर्ते सहकार्य करतील. प्रत्येक गाव व वस्ती या अभियानात जोडण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक स्वयंसेवी व सेवाभावी संघटनांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
संघाच्या सद्यस्थितीत २७ हजार १६६ शाखा सुरू आहेत. तसेच, १२ हजार २८८ ई-शाखा अशा एकूण ३९ हजार ४५४ शाखा आहेत. साप्ताहिक बैठकीचे १० हजार १३० कार्यक्रम चालतात. लॉकडाउनच्या काळात देशभरात ९ हजार ६३७ कौटुंबिक स्नेहमिलन आयोजित केले. विरोध दुर्लक्षून जनाधार व्यापक करण्यासाठी रा. स्व. संघ जिद्दीने पुढे सरसावणार असल्याचे संकेत या घडामोडींनी दिले आहेत.
Arun Kumar from Rashtriya Swayamsevak Sangh has the responsibility of coordinating with BJP
महत्त्वाच्या बातम्या
- महामारीदरम्यान देशात UPIच्या माध्यमातून वाढले डिजिटल व्यवहार, गतवर्षी झाले 41 लाख कोटींचे ट्रान्झॅक्शन
- टी-सिरीजच्या भूषण कुमारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, काम देण्याच्या आमिषाने 30 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप.
- तालिबानला पाहिजेत 15 वर्षांपुढील मुली आणि 45 पेक्षा कमी वयाच्या विधवा, मौलवींना मागितली यादी, दहशतवाद्यांशी लावणार लग्न
- जम्मू-काश्मिरात बकरीदला गाय व उंट यांच्या कुर्बानीवर बंदी, सरकारकडून आदेश जारी