वृत्तसंस्था
मनिला : मास्क योग्य पद्धतीने न घालणाऱ्या व्यक्तींना अटक करा असा आदेश फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रीगो ड्युटेर्टे यांनी पोलिसांना दिला आहे. त्यांनी कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली. मात्र त्यावेळी ते सोडून इतर सर्वांनी मास्क घातला होता. त्यावरून आता देशभऱ चर्चेचा उधाण आले आहे. Arrest people who are not wearing mask
ड्युटेर्टे यांचे प्रवक्ते हॅरी रोक्यू यांनी असा आदेश जारी करण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार दोषी व्यक्तीवर कोणताही आरोप न ठेवता त्याला १२ तास डांबून ठेवले जाईल.
गेल्या वर्षी लॉकडाउन मोडणाऱ्यास आणि समस्या निर्माण करणाऱ्यास गोळ्या घालाव्यात असा आदेश ड्युटेर्टे यांनी दिला होता. त्यावेळी मानवी हक्क संघटनांनी त्यांच्यावर टीका केली होती.
यावेळी बेठकीनंतर ड्युटेर्टे म्हणाले कोरोना निर्बंध मोडणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर बनावे. नाकाखाली मास्क असल्यास त्याला अटक करावी. तो मास्क नीट का घालत नाही याची चौकशी करावी. हे माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी आहे. तुम्हाला संसर्ग होऊ नये आणि तुमच्यामुळे संसर्ग होऊ नये हे देशाच्या हिताचे आहे.
Arrest people who are not wearing mask
महत्त्वाच्या बातम्या
- सीसीटीव्ही फुटेजमध्ये हाणामारीत कुस्तीगीर सुशीलचा सहभाग असल्याचे स्पष्ट, दिल्ली पोलिसांची पकडण्यासाठी मोहीम
- पित्याच्या मृत्यूने शोकाकूल झालेल्या मुलीची पित्याच्या चितेवर उडी, राजस्थानातील घटनेने सारे सुन्न
- पोलिसांनी सोशल मीडियावर काय करावे व काय करू नये यासाठी केंद्राचे नवे धोरण, युजर्सशी वाद टाळण्याचा सल्ला