• Download App
    तब्बल दीड कोटी कासवांची उवलिशी पिले समुद्राच्या दिशेने झेपावली, ओरिसात रंगला ऑलिव्ह रिडलेच्या जन्माचा अनोखा सोहळा | Around 1.48 crore baby Olive Ridley turtles hatched at Gahirmatha beach in Odisha

    तब्बल दीड कोटी कासवांची इवलिशी पिले समुद्राच्या दिशेने झेपावली, ओरिसात रंगला ऑलिव्ह रिडलेच्या जन्माचा अनोखा सोहळा

    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर – ओरिसातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर या हंगामात तब्बल एक कोटी ४८ लाख ओलिव्ह रिडले कासवांचा जन्म झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या किनाऱ्यावर रोज हजारो कासवाची इवलीशी पिले अंड्यातून बाहेर पडली आणि समुद्राच्या कुशीत शिरली. Around 1.48 crore baby Olive Ridley turtles hatched at Gahirmatha beach in Odisha

    ओरिसातील किनारे या कासवांच्या प्रजननासाठी उत्तम नाली जातात. त्यामुळे दरवर्षी हजारो कासवे येथे अंडी घालण्यास येतात. मात्र यंदा पिलांचा जन्म होण्याचा जणू विक्रमच झाला आहे. निसर्गाचा हा अदु्भत चमत्कार कॅमेरात बंदिस्त झाला असून त्याचे व्हिडीओ सोशल मिडायावरून पाठवले जात आहेत.



    ऑलिव्ह रिडले कासवांसाठी ओरिसातील समुद्रकिनारे जगात प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात वेळासला देखील ही कासवे अंडी घालण्यासाठी दरवर्षी येतात. मात्र त्यांची संख्या फार नसते. या कासवांचे वैशिष्ठ्य म्हणजे ज्या किनाऱ्यावर ती जन्म घेतात आणि तेथून ती चालत समुद्रात प्रवेश करतात. त्यावेळी चालताना त्यांच्या मेंदूत त्या किनाऱ्याची नोंद होते. त्यामुळे पुढे मोठे झाल्यावर अंडी गालण्यासाठी ही कासवे जन्म दिलेल्या किनाऱाच पसंत करतात.

    प्राणीजगतात हा चमत्कार मानला जातो. त्यामुळे अंड्यातून बाहेर आलेल्या कासवांना उचलून समुद्रात सोडले जात नाही. ही कासवे स्वतःच्या पायांनी चालत जाजात आणि त्यांना तसे जावू दिले जाते. यावेळी त्यांच्यात ब्रेन मॅपिंगच होत असते.

    या हंगामात सुमारे तीन लाख घरट्यांत मादी कासवांनी अंडी घातली होती. वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घरट्यांची योग्य प्रकारे निगा राखल्याने यावेळी एतक्या मोठ्या प्रमाणात पिलांचा जन्म झाल्याचे वन्यजीव विभागाचे अधिकारी विकास रंजन दास यांनी वृत्तसंस्थेसी बोलताना सांगितले.

    ते म्हणाले साधारणपणे २५ एप्रिलला अंडी उबून त्यातून पिले बाहेर येण्यास सुरवात झाली. अंड्यातून बाहेर पडणारे पिलू पटकन समुदाच्या दिशेने झेपावते. मात्र या पावलांमध्ये फारशी ताकद नसते. त्यांच्या क्षमतेनुसार समुद्रात जाण्यासाठी त्यांना एक तासाचा अवधी लागतो. या वर्षी ओरिसातील या किनाऱ्यावर तब्बल साडे तीन लाख कासवे अंडी घालण्यासाटी आली होती.

    Around 1.48 crore baby Olive Ridley turtles hatched at Gahirmatha beach in Odisha

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार