• Download App
    तामिळनाडूत संतापजनक घटना; काश्मीरमध्ये सीमेवर तैनात असलेल्या जवानाच्या पत्नीला अर्धनग्न करून गुंडांकडून मारहाण Army jawans wife assaulted by goons in Tamilnadu

    तामिळनाडूत संतापजनक घटना; काश्मीरमध्ये सीमेवर तैनात असलेल्या जवानाच्या पत्नीला अर्धनग्न करून गुंडांकडून मारहाण

    भाजपा उभा राहिली जवानाच्या कुटुंबाच्या पाठीशी, जवानाने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे स्टॅलिन सरकारला मागितला न्याय

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तामिळनाडूमध्ये स्टॅलिन सरकारच्या राज्यात एक धक्कादायक आणि संतपाजनक घटना समोर आली आहे. येथे वेल्लोरमध्ये एका महिलेला अर्धनग्न करत १२० गुडांकडून बेदम मारहाण करण्यात आली. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे पीडित महिलेचा पती भारतीय लष्करात असून तो सध्या काश्मीरमध्ये देश रक्षणासाठी सीमेवर तैनात आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Army jawans wife assaulted by goons in Tamilnadu

    पीडित महिलेच्या पतीने या घटनेवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तामिळनाडू सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे की, ‘मी देशाला शत्रूंपासून वाचवण्यासाठी भारतीय सैन्यात आहे आणि सध्या काश्मीरमध्ये तैनात आहे. मी माझ्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर आहे. माझ्या पत्नीला अर्धनग्न करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. याचबरोबर व्हिडिओमध्ये तो हात जोडून गुडघ्यावर बसून तामिळनाडू सरकारकडे न्याय मागताना दिसत आहे.

    लष्करात हवालदार पदावर असलेल्या प्रभाकरन यांच्या पत्नीला स्थानिक गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना काही वेळातच व्हायरल झाली. या महिलेला जीएच वेल्लोर अदुक्कमपराई येथे दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

    अखिल भारतीय माजी सैनिक परिषद तामिळनाडूचे वरिष्ठ उपाध्यक्ष एन थियागराजन वेटरन यांनी सांगितले की, मी या घटनेचा निषेध करतो आणि त्वरित कारवाईची विनंती करतो. ते म्हणाला आपण कोणत्या जगात आहोत? तामिळनाडूत पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेल्या लष्कराच्या जवानाची ही दयनीय अवस्था आहे. जेव्हा एखादा सैनिक देशाच्या रक्षणासाठी जातो तेव्हा त्या सैनिकाची पत्नी आणि कुटुंबाची काळजी घेणे ही सरकारची सर्वोच्च जबाबदारी असते. तामिळनाडूमध्ये अशा घटनांमध्ये झालेली वाढ ही अराजक परिस्थिती दर्शवते. याप्रकरणी तातडीने कारवाई करून महिलांची इज्जत वाचवावी, अशी माझी विनंती आहे.

    भाजपाने केली जोरदार टीका-

    तामिळनाडू भाजप अध्यक्ष म्हणाले की, काश्मीरमध्ये आपल्या देशाची धैर्याने सेवा करणाऱ्या हवालदार आणि तिरुवन्नमलाई येथे राहणाऱ्या त्यांच्या पत्नीशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्याच्या बद्दल घडलेली घटना ऐकून खूप वाईट वाटले. आपल्या तमिळ भूमीत त्यांच्यासोबत असे घडले याची मला लाज वाटली. आमच्या पक्षाचे लोक आता त्यांना भेटणार आहेत, ज्या वेल्लोरच्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहेत.

    Army jawans wife assaulted by goons in Tamilnadu

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!