• Download App
    ॲपल सीईओ टीम कूक - पंतप्रधान मोदी भेट; भारतात अधिक गुंतवणुकीची दिली ग्वाही!! |Apple CEO Tim Cook - PM Modi visit; Guaranteed more investment in India!!

    ॲपल सीईओ टीम कूक – पंतप्रधान मोदी भेट; भारतात अधिक गुंतवणुकीची दिली ग्वाही!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ॲपलचे स्टोअरची मुंबईत उघडल्यानंतर दिल्लीत त्याची शाखा उघडण्यापूर्वी ॲपल सीईओ टीम कूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7, लोक कल्याण मार्ग या त्यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. भारतासारख्या विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेत अधिकाधिक गुंतवणूक करण्याची ग्वाही टीम कूक यांनी पंतप्रधान मोदींना दिली. या भेटीचे ट्विट टीम कूक यांनी केले आहे.Apple CEO Tim Cook – PM Modi visit; Guaranteed more investment in India!!



    टीम कूक यांच्या ट्विटला पंतप्रधान मोदींनी देखील प्रतिसाद दिला आहे. ॲपलचे सीईओ टीम कूक यांच्याशी तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भारतात झालेले बदल या विषयावर व्यापक चर्चा झाली. तंत्रज्ञानात भविष्यात होणारे बदल याविषयी त्यांचे विचार समजावून घेताना आनंद वाटला, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

    भारतातले पहिले ॲपल स्टोअर मुंबईत उघडल्यानंतर तेथे तरुणाईने प्रचंड गर्दी केली होती. ॲपलला असाच प्रतिसाद दिल्लीच्या साकेत मध्ये अपेक्षित आहे. तिथेही नवे ॲपल स्टोअर सुरू झाले आहे.

    Apple CEO Tim Cook – PM Modi visit; Guaranteed more investment in India!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले