• Download App
    कोरोना मदतीत योगी आदित्यनाथांचे आणखी एक पाऊल, रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देणार|Another step of Yogi Adityanath with the help of Corona, will give Remedesivir injection free of cost

    कोरोना मदतीत योगी आदित्यनाथांचे आणखी एक पाऊल, रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देणार

    महाराष्ट्रासारख्या राज्यात सरकारला जनतेला विकतही रेमडेसिवीर इंजेक्शन देणे अवघड झाले असताना उत्तर प्रदेशात मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी सर्वांना मोफत देण्याची घोषणा केली आहे. सर्व सरकारी, तसेच सरकारी रुग्णालयांतून खासगी रुग्णालयांत रेफर केलेल्या कोरोना रुग्णांना नि:शुल्क रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.Another step of Yogi Adityanath with the help of Corona, will give Remedesivir injection free of cost


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : महाराष्ट्रासारख्या राज्यात सरकारला जनतेला विकतही रेमडेसिवीर इंजेक्शन देणे अवघड झाले असताना उत्तर प्रदेशात मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी सर्वांना मोफत देण्याची घोषणा केली आहे.

    सर्व सरकारी, तसेच सरकारी रुग्णालयांतून खासगी रुग्णालयांत रेफर केलेल्या कोरोना रुग्णांना नि:शुल्क रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.एखाद्या खासगी रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसेल



    आणि तेथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी ते आवश्यक असेल, तर तेथील जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाºयांनी त्या रुग्णालयासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

    मागणी प्रमाणे, विविध जिल्ह्यांना मुबलक प्रमाणात रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्यात यावे. जर आवश्यकता असेल, तर खासगी रुग्णालयांनाही निर्धारित दरांत रेमडेसिव्हिर द्यावात, असे आदेशही मुख्यमंत्री योगींनी दिले आहेत.

    Another step of Yogi Adityanath with the help of Corona, will give Remedesivir injection free of cost

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य